ठाणे : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष सोडले असू या निर्णयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशाचप्रकारे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत “सत्याचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशाचप्रकारे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत “सत्याचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या १७ वर्षांपासून हा खटला सुरू होता. अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी असा दावा केला होता की त्यांनी एटीएसच्या दबावाखाली काही विधाने केली होती. पण आज सर्व काही उघड झाले आहे, असे म्हस्के म्हणाले.
कारवाई खोटी
काँग्रेस सरकारने हिंदू दहशतवादाच्या नावाखाली लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी कारवाई केली. आज हे सिद्ध झाले आहे की त्यांनी केलेली कारवाई खोटी होती. मालेगाव स्फोट प्रकरणातील न्यायालयीन निर्णयावर पीडित कुटुंबांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. एका पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना आपल्या पतीच्या मृत्यूचा उल्लेख करत न्यायाच्या प्रतीक्षेचा त्रासदायक प्रवास सांगितला, असेही म्हस्के म्हणाले.
धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदू समाजाला लक्ष्य
काँग्रेस सरकारने मुद्दामून धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदू समाजाला लक्ष्य केले. एटीएस (ATS ) कडून दबावाखाली जबाब घेण्यात आले, अशी अधिकाऱ्यांनी कबुली दिली होती. आजच्या निर्णयामुळे हिंदू समाज आणि निर्दोष व्यक्तींना न्याय मिळाला आहे, असे म्हस्के म्हणाले.