कल्याण- येथील वाडेघर भागातील रौनक सिटी भागातील चौदाव्या माळ्यावरील एका घराला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत एक महिला गंभीर जखमी झाली. आगीत घर जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासात आग आटोक्यात आणली. रौनक सिटीमधील एका इमारतीमधील चौदाव्या माळ्यावर एक महिला घरात स्वयंपाक करत होती.

हेही वाचा >>> विहिरीत पडलेल्या नीलगायीची सुटका; आपदा मित्र प्रशिक्षणार्थींच्या मदतीने नीलगायीला जीवदान

शेगडीची ज्योत पेटती होती. या महिलेच्या साडीच्या पदराचे टोक वाऱ्याने पेटत्या वातेच्या दिशेने गेले. क्षणार्धात साडीने पेट घेऊन महिला गंभीर भाजली. शेजाऱ्यांनी महिलेच्या अंगावर पाणी ओतून तिला तात्काळ रुग्णालयात नेले. पेटती साडी घरात पडल्याने घरातील फर्निचरने पेट घेतला. रहिवाशांनी पाणी ओतले. त्याचा उपयोग झाला नाही. घरातील फर्निचरमुळे आग घरात पसरली. आगीत घर खाक झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.