बळींची संख्या दोनवर
पाणजू बोट दुर्घटनेत जखमीे असलेल्या एका महिलेचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. गीेता पाटील (३८) असे त्यांचे नाव असून त्या भाईंदर येथे राहणाऱ्या होत्या. त्यामुळे या दुर्घटनेतीेल मृतांचीे संख्या दोन झालीे आहे.
रविवारी सकाळी नायगाव खाडीत बोट उलटून दुर्घटना घडलीे होतीे. पाणजू येथे एका लग्नसमारंभासाठी ही बोट जात होतीे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत चढल्याने बोट उलटून हा अपघात झाला होता. यावेळी रामचंद्र म्हात्रे यांचा त्याच दिवशीे बुडून मृत्यू झाला होता, तर २२ जण जखमीे झाले होते. यापैकी गीता पाटील (३८) या अत्यवस्थ होत्या. त्यांच्या नाकातोंडात चिखल आणि पाणीे गेले असल्याने त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता. त्यांना मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचीे प्रकृतीे बिघडलीे होतीे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांचीे प्रकृतीे अधिकच खालावल्याने त्यांना लिलावलीे रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु वाटेतच त्यांचे निधन झाले.

बोट मालकावर गुन्हा
पाणजू बोट दुर्घटनाप्रकरणी अखेर पाच दिवसांनी पोलिसांनी बोट मालक गणेश पाटील याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.