ठाणे : प्रवास थकव्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रतिक्षालया बाहेर झोपलेल्या एका प्रवासी मजुराचा मोबाईल चोरी झाला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये ३२ वर्षीय मजुर त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याला बुधवारी सकाळी मुलुंड येथे एका कामासाठी जायचे होते. त्यामुळे तो १३ मे या दिवशी पश्चिम एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने बोरीवली स्थानकात उतरला.

सकाळी लवकर यायचे असल्याने त्याने बोरीवली येथून मंगळवारी रात्रीच उपनगरीय रेल्वेगाडीने ठाणे रेल्वे स्थानक गाठले. रात्री ठाणे स्थानकात झोपल्यानंतर तो सकाळी मुलुंड येथे कामाच्या ठिकाणी जाणार होता. मंगळवारी रात्री तो ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन येथील प्रतिक्षालयाबाहेर बसला होता. परंतु प्रवास थकव्यामुळे त्याला अचानक झोप लागली.

बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास प्रवाशांची गर्दी वाढली. त्यामुळे त्याला जाग आली. त्यावेळी त्याच्या पँटच्या खिशातील मोबाईल चोरी झाला होता. यानंतर मजुराने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. तेथे त्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन येथील प्रतिक्षालयात आणि बाहेरील भागातून अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. हे मोबाईल प्रवासी झोपल्यानंतर चोरी होत असतात. त्यामुळे या प्रतिक्षालयात चोरट्यांचा सुळसुळाट असल्याची चर्चा आहे.