ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात ठाकरे गटाच्या दोन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटने प्रकरणी दोन्ही गटांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यामुळे दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राडा झाला त्यावेळेस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, शिवसेनेने दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढले. श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेरही दोन्ही गट समोरासमोर आल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. घटनेनंतर ठाकरे गटाकडून समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यात गुंडाराज सुरू आहे का? असा आरोप ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किसननगर ही राजकीय कर्मभूमी आहे. येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, केदार दिघे हे देखील उपस्थित होते. याच दरम्यान शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जाणकर त्याठिकाणी आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही गटात वाद झाला. या वादात ठाकरे गटाचे दोन पदाधिकारी जखमी झाले. राजन विचारे आणि दिघे यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढले. याठिकाणी राज्यराखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला.

हेही वाचा: VIDEO: ठाण्यात शिंदे-ठाकरे गटांत जोरदार राडा, खासदार राजन विचारे यांच्यासमोर कार्यकर्त्यांना मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर राजन विचारे हे श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे देखील त्याठिकाणी आले. दोन्ही गटाने एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या. त्यानंतर दोन्ही गटाच्या एकमेकांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस ठाण्याबाहेरही दोन्ही गट समोरासमोर आल्याने पोलिसांनी दोन्ही गटावर लाठीमार केला आणि जमाव पांगवला.