लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: घोडबंदर येथील ओवळे गाव भागात बंधाऱ्याचा पाण्यात गेलेला १९ वर्षीय मुलगा बुडाला. चिराग जोशी असे त्याचे नाव असून त्याचा मृतदेह सापडला आहे.
कळवा येथील पारसिक नगर भागात चिराग राहतो. बुधवारी सायंकाळी तो ओवळे येथील पानखंडा परिसरातील बंधाऱ्याच्या पाण्यात बुडाला. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथक त्याचा शोध घेत होते. परंतु त्याचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर आजही त्याचा शोध घेतला जात होता. अखेर त्याचा मृतदेह सापडला.