लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : पार्टी करण्यासाठी उसने पैसे दिले नाही म्हणून तरूणाला त्याच्या मित्रांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात विकी डॅनियल, जॉकी डॅनियल आणि त्यांच्या एका सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळवा येथील शांतीनगर भागात मारहाण झालेला तरूण राहातो. त्याचे याच भागात राहाणारे जॉकी आणि विकी हे दोघे मित्र आहे. सोमवारी तरूण कामाहून घरी परतल्यानंतर त्याला जॉकी, विकी आणि त्यांचा एक सहकारी भेटला. त्यावेळी विकीने तरूणाकडून पार्टी करण्यासाठी उसने पैशांची मागणी केली. परंतु पैसे नसल्याचे तरूणाने सांगितले असता, जॉकीने त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर विकी याने तरूणाच्या डोक्यात लाकडी बांबूने प्रहार करत बेदम मारहाण केली.

आणखी वाचा-अंबरनाथच्या शिवमंदिरावरील शिल्प निखळले, तज्ज्ञांच्या नाराजीनंतर पुरातत्व खात्याची धावाधाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरूणाच्या डोक्यातून रक्तस्त्राव येऊ लागल्यानंतर तिघांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती कळवा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तरूणाला उपचारासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार झाल्यानंतर तरूणाने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.