इन्साटग्रामच्या माध्यमातून कल्याण मधील एका तरुणीला भामट्याने संपर्क करुन तुम्ही कुटचलनात (क्रिप्टोकरन्सी) पैसे गुंतविले तर ते पैसे आम्ही २० ते ३० मिनिटात दुप्पट करुन देतो असे सांगितले. तरुणाने भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन मागील चार महिन्यात एकूण एक लाख ८१ हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणुकीनंतर अर्ध्या तासात पैसे दुप्पट नाहीच, पण मुळ मुद्दल रक्कमही भामट्याने स्वताच्या खात्या मध्ये वळती करुन त्या रकमेचा अपहार केला व तरुणीची फसवणूक केली.
हेही वाचा – ठाणे : वर्गणी दिली नाही म्हणून ‘आयबी’ अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न
तरुणीच्या तक्रारी वरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्ति विरुध्द माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.अश्लेषा बाबुलाल तलकोक्कुल (२६) असे फसवणूक झालेल्या नोकदार तरुणीचे नाव आहे. ती कल्याण पश्चिमेतील म्हसोबा मैदाना जवळील मयुरेश दर्शन सोसायटीत राहते. ट्रेडर्स शर्मा, रिचेस्ट शर्मा शनया चौहान या इन्स्टाग्रामधारका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० मे २०२२ ते २ जून २२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
हेही वाचा –ठाण्यातील आरे वाचवा आंदोलनात ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पाठ
पोलिसांनी सांगितले, अश्लेषा तलकोकुक्ल ही तरुणी नोकरी करते. मे ते जून या कालावधीत एका भामट्याने तरुणीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने संपर्क केला. तुम्ही कुटचलनात गुंतवणूक केली तर आम्ही ते पैसे तुम्हाला २० ते ३० मिनिटात दुप्पट करुन देतो असे सांगितले. पैसे झटपट दुप्पट होतात या भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तरुणीने गुंतवणुकीची तयारी दर्शविताच. स्वताची आर्थिक व्यवहाराची माहिती तरुणीने भामट्याला दिली. ही माहिती मिळताच भामट्याने तरुणीच्या एचडीएफएसी, साऊथ इंडियन बँक खात्यामधून वेळोवेळी खोटी कारणे सांगून लबाडीने बँक खात्यामधून एकूण एक लाख ८१ हजार ५०० रुपये काढून घेतले.
तरुणीने रक्कम दुप्पट करुन परतावा देण्याची मागणी केली. तो वेळोवेळी खोटी कारणे सांगून वेळकाढूपणा करत होता. भामट्याने आपली फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यावर तरुणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सायबर सेल कक्षाच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे.
