यंत्रांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध

एखादे यंत्र किंवा संगणकाची आज्ञावली मानवी पातळीची बुद्धिमत्ता दाखवू शकते की नाही हे ठरवण्यासाठी आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या टय़ुरिंग चाचणीला अमेरिकी वैज्ञानिकाने पर्याय शोधून काढला आहे.

एखादे यंत्र किंवा संगणकाची आज्ञावली मानवी पातळीची बुद्धिमत्ता दाखवू शकते की नाही हे ठरवण्यासाठी आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या टय़ुरिंग चाचणीला अमेरिकी वैज्ञानिकाने पर्याय शोधून काढला आहे. यापूर्वी टय़ुरिंग चाचणी अ‍ॅलन टय़ुरिंग यांनी १९५० मध्ये शोधली होती. प्रत्यक्षात त्याचे काही उपयोग हे मशीन व मानव यांच्यातील संवाद व यंत्राची बुद्धिमत्ता तपासणे हा होता. जॉर्जिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे सहायक प्राध्यापक मार्क रिडल यांनी सांगितले, की काही प्रकारच्या कलाकृती तयार करतानासुद्धा बुद्धिमत्ता लागते व त्यातून एखाद्या यंत्राला माणसाच्या विचाराची नक्कल तरी करता येते की नाही याचा शोध घेता येतो. रिडल यांनी सांगितले, की टय़ूरिंगला ही चाचणी कधीच यंत्र व संगणक आज्ञावली यांच्यातील बुद्धिमत्तेच्या संबंधांच्या चाचणीचा मापदंड होऊ शकेल असे वाटले नव्हते. कलाकृती बनवताना विस्तृत स्वरूपाची बुद्धिमत्ता असावी लागते. त्यामुळे टय़ुरिंग चाचणी अचूक आहे अशातला भाग नाही. रिडल यांनी लोव्हेलेस २.० ही कृत्रिम बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेची नवी चाचणी असलेले सॉफ्टवेअर किंवा आज्ञावली केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्राने सर्जनशीलता दाखवली, तरच मानवी व यांत्रिक पातळीवर ते यंत्र उत्तीर्ण होते. यात कलात्मकतेला सौंदर्यमूल्य नसले तरी चालेल असे गृहीत धरले असले तरी सर्जनशीलता आवश्यक आहे.

लोव्हलेस २.० चाचणी २००२ मध्ये ब्रिंग्जजोर्ड, बेलो व फेरूसी यांनी शोधली होती. मूळ चाचणीत कृत्रिम घटक हा सर्जनशील वस्तू किंवा रचना तयार करीत असे जी डिझायनरलाही वर्णन करता येत नसे. रिडेल यांच्या मते मूळ लोव्हलेस चाचणीत काही मापनात्मक व स्पष्ट घटक नाहीत. लोव्हेलेस २.० यात मात्र त्या वस्तूने आश्चर्य निर्माण केले किंवा इतर कुठल्या तत्त्वांचा आधार घेतलेला नाही. रिडेल हे बियाँड द टय़ुरिंग टेस्ट या विषयावर असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळेत टेक्सासमधील ऑस्टिन येथे शोधनिबंध सादर करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Research on devices of artificial intelligence