‘निसर्ग टूर्स’ संस्थेतर्फे येत्या ६ ते १० मे दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. सध्या व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झालेल्या या ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटालाही भेट दिली जाणार आहे. संपर्क- विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
ताडोबा जंगल सफारी
ट्वाईन आऊटडोअर्सतर्फे ९ ते ११ मे आणि ६ ते ८ जून दरम्यान ताडोबा अभयारण्यामध्ये जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील ताडोबाचे जंगल वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. वाघाबरोबरच येथे बिबळ्या, मगर, अस्वल, रानकुत्रे, हरिण, सांबर असे खूप वन्यप्राणी दिसतात. तसेच स्वर्गीय नर्तक, नीलपंख, गरुड, घुबड असे स्थानिक आणि विविध स्थलांतरित पक्षी पाहण्याची संधीही या सफारीमध्ये मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क अर्चिस सहस्रबुद्धे ९८९२१७२४६७ किंवा पराग जोशी ९८३३५२४२४८.
महिलांसाठी राजगड मोहीम
जागतिक महिलादिनाच्या (८ मार्च) निमित्ताने खास महिलांसाठी येत्या ९ मार्च रोजी छत्रपती शिवाजीमहाराजांची राजधानी राजगडावर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विशाल कडूसकर (९९२१५१९७५०) यांच्याशी संपर्क साधावा.