News Flash

घर जळून खाक; 5 वर्षाच्या मुलाने वाचवले 13 जणांचे प्राण

अमेरिकेतील शिकागो येथे ही घटना घडली.

फोटो सौजन्य : सीबीएस शिकागो

मुलांच्या शौर्याचे अनेक किस्से आजवर सर्वांनी ऐकले असतील किंवा पाहिलेही असतील. असाच एक किस्सा नुकताच घडला ज्यात पाच वर्षाच्या चिमुरड्याचं शौर्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एक घर पूर्णपणे जळून खाक झालं, परंतु त्या घरातील सर्वजण मात्र सुखरूप आहेत. हे घडलं ते केवळ त्या चिमुरड्यामुळे. त्याचं नाव आहे म एस्पिनोसा. ज्यावेळी घरातील किचनमध्ये आग लागल्याचं त्याला दिसलं तेव्हा त्यानं धावत जाऊन याची कल्पना आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्या घरातील सर्वजण सुखरूप बाहेर पडले. या घटनेची माहिती आसपासच्या लोकांना कळल्यानंतर त्याच्या शौर्याचं सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.

अमेरिकेतील शिकागो येथे शनिवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली. जेडेनला पहाटे आपल्या घरातील किचनमधून धुर आणि आगीचे लोट दिसले. त्यावेळी आपल्या घरात आग लागली असल्याचे त्याला जाणवलं. परंतु मोठ्या धैर्याने तो आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने याची माहिती आपल्या कुटुंबीयांना देत घरातून बाहेर पडण्यास सांगितले.
दरम्यान, आज त्याने आम्हाला याची माहिती दिली नसती तर आमच्यातील कोणीही जिवंत दिसलं नसतं, अशी प्रतिक्रिया जेडेनच्या कुटुंबीय निकोल पिपल्स यांनी दिली. जेडेन त्या ठिकाणी होता म्हणून आज सर्वांचे जीव वाचले. घरात कोणालाही जळण्याच्या दुर्गंधही आला नाही, तसंच घरातला फायर अलार्मदेखील बंद होता असं त्या म्हणाल्या. आपल्या मुलाच्या धैर्याचे त्यांच्या वडिलांनीही मनभरून कौतुक केले. आग लागली त्यावेळी त्या घरात 6 मुलं आणि 7 मोठी माणसं होती. दरम्यान, ही आग का लागली याचा तपास सध्या सुरू आहे. तसेच या आगीत संपूर्ण घर जळाल्यामुळे त्या कुटुंबीयांना आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2019 6:37 pm

Web Title: 5 year boy saved 13 people in house america chicago jud 87
Next Stories
1 VIDEO: कोमोडो ड्रॅगनने माकडाला जिवंत गिळले
2 Viral video : दारूच्या नशेत तरूणाने चक्क घेतला पोलीस अधिकाऱ्याचा मुका
3 आगळावेगळा सन्मान; वाघाच्या बछड्याला दिलं हिमा दासचं नाव
Just Now!
X