News Flash

kiki challenge नंतर आलेल्या Dragon’s Breath मुळे तुम्ही पडू शकता आजारी

हा पदार्थ खाल्ल्याने तोंड जळण्याची शक्यता असते

kiki challenge सध्या देशांत आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या चॅलेंजमुळे अनेक देशांतील पोलीस हैराण झाले आहेत. सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूडमधील कलाकारांमध्येही या चॅलेंजची क्रेझ आहे. हे मागे पडत नाही तोच आता आणखी एक नवीन चॅलेंज येऊ घातले आहे. या चॅलेंजचे नाव Dragon’s Breath असून त्यामुळे तुम्ही गंभीररित्या आजारी पडू शकता. प्रत्यक्षात ही अशी एक कॅंडी आहे जी जिभेवर ठेवताच त्यातून धूर येण्यास सुरुवात होते. इतकेच नाही तर यामुळे तुमचे तोंड आणि तोंडातील इतर अवयव वितळू शकतात.

ही कँडी लिक्विड नायट्रोजनमध्ये बुडवून ती खायला दिली जाते. सोशल मीडियावर ही कँडी खातानाचे फोटो आणि व्हिडियो अपलोड करण्याचे फॅड आले आहे. अनेक तरुण-तरुणी आपले तोंडातून धूर येत असल्याचे दिसणारी कँडी खातानाचे फोटो आणि व्हिडियो इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर शेअर करत आहेत. आरोग्य संस्थांनी नोंदविलेल्या निरक्षणानुसार, या लिक्विड नायट्रोजनच्या वापरामुळे तोंड, अन्ननलिका आणि पोटाला हानी पोहोचू शकते. ड्रॅगन ब्रीथ एकदम थंड केलेल्या धान्याला द्रव स्वरुपातील नायट्रोजनमध्ये मिसळून बनविली जाते. हे अतिशय थंड झालेले धान्य कपाच्याच आकाराच्या भांड्यात ते खायला दिले जाते. हा द्रव नायट्रोजन व्यक्तीची बाहेरील त्वचा आणि आतील अवयवांना खराब होण्यास कारणीभूत ठरतो. हा वायू शरीरात गेल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.

नुकतेच हे चॅलेंज करताना फ्लोरिडामध्ये एका तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली होती. त्यानंतर त्याच्या आईने सोशल मीडियावरुन ड्रॅगन ब्रीथ न खाण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे अशाप्रकारच्या चॅलेंजपासून सावध राहण्याची आवश्यकता असून इतर लोक करतात म्हणून तुम्हीही अशाप्रकारे चॅलेंज स्विकारुन त्याचा बळी होऊ नका. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 8:32 pm

Web Title: after kiki challenge dragons breath trend is going viral which is harmful
Next Stories
1 India vs England : बार-बार लगातार…. अश्विनच्या जाळ्यात आठव्यांदा अडकला ‘हा’ दिग्गज
2 दिसतं तसं नसतं! ‘जेलो’च्या नव्या फॅशनची सगळीकडेच चर्चा
3 प्री-बूकिंगआधीच Reliance Jio GigaFiber च्या किंमती झाल्या लिक, जाणून घ्या डिटेल्स
Just Now!
X