आपलं छोटंस का होईना पण घरं असावं. त्या घरात आपुलकीची, जीवाला जीव लावणारी माणसं असावी अशी स्वप्न प्रत्येकाची असतात पण जगात अशी कोट्यवधी लोक आहेत ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाहीत त्यामुळे जिथे मिळेल तिथे आपला सुखाचा संसार ते फुलवतात. काही दिवसांपूर्वी कोलंबीयाच्या एका जोडप्याचा फोटो व्हायरल झाला होता. या जोडप्याने चक्क पाइपलाइनमध्ये आपला संसार थाटला होता. आता अशाच एका परिवाराची कथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घराचे भाडे देण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने या कुटुंबाने बसमध्ये आपला संसार थाटला आहे.

वाचा : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..

ब्रिएन आणि त्यांची पत्नी स्टार्ला ही गेल्या तीन वर्षांपासून अर्थिक समस्यांचा सामना करत आहे. २०१४ मध्ये त्यांची नोकरी गेली. आर्थिक समस्या असल्याने या कुटुंबाकडे घराचे भाडे देण्याएवढे पैसे नव्हते. कुटुंबाला रस्त्यावर ठेवू शकत नाही म्हणूनच जी काही थोडी फार पुंजी होती त्यातून या कुटुंबाने बस खरेदी केले. ब्रिएन एरोस्पेस मॅकॅनिक आहेत. त्यांनी एक वर्ष मेहनत घेऊन या सहा फुट लांब असलेल्या बसला घराचे रुप दिले. ब्रिएन आणि स्टार्लाला तीन मुलं आहे. हे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून या बसमध्ये राहत आहे. या बसमध्ये स्वयंपाकघरही बिएनने बनवले आहे. आपल्या मुलांच्या छोट्या मोठ्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी या गाडीची रचना केली आहे.

Valentine’s day 2017: युध्दात फुललेला ‘व्हॅलेंटाईन डे’!!

आपल्याकडे इतरांसारखे घर नाही पण या चलत्या फिरत्या घरात आपण सुखी आहोत असे हे जोडपे सांगते. अनेकदा आयुष्यात कठीण प्रसंग येतात. नेहमीच संसार सुखाचा होईल असे नाही पण दुखाच्या दिवसातही सुखाचा संसार करता आला पाहिजे. जगण्याची हिच शिकवण हे जोडपे जगाला देते.