भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये सोशल मीडियावर हा विषय चर्चेत असताना काल चीनच्या Global Times या वृत्तपत्राचे संपादक हू शिजिन (Hu Xijin यांनी भारतीयांना टोमणा मारला. त्यावर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्र यांनी शानदार उत्तर दिलं.

“चीनच्या लोकांनी भारतीय वस्तूंना बॅन करायचं ठरवलं तरी ते करु शकत नाहीत, कारण इकडे भारतीय वस्तू खूप कमी आहेत…” अशा आशयाचं ट्विट हू शिजिन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केलं होतं. “भारतीय मित्रांनो तुमच्याकडे राष्ट्रवादापेक्षा महत्त्वाचं काहीतरी असायला हवं…”असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

(CamScanner, TikTok वरील बंदीचं ‘नो टेन्शन’, ही घ्या पर्यायी Apps ची लिस्ट)

भारतीयांना चिथवणाऱ्या या ट्विटवर आनंद महिंद्रांचं लक्ष गेलं. त्यांनी शिजिन यांच्या त्या ट्विटला रिट्विट करत प्रत्युत्तर दिलं. “ही टिप्पणी कदाचित भारतीय कंपन्यांसाठी सर्वात प्रभावी आणि प्रेरक असेल…चिथवल्याबद्दल आभार” असं म्हणत महिंद्रा यांनी, तुमचं चॅलेंज स्वीकारलं अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

(CamScanner, TikTok वरील बंदीचं ‘नो टेन्शन’, ही घ्या पर्यायी Apps ची लिस्ट)
आनंद महिंद्रा यांचं हे ट्विट भारतीय नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं असून ६६ हजारांहून अधिक जणांनी ते आतापर्यंत लाइक केलं आहे. त्यावर नेटकरी आपल्या विविध प्रतिक्रियाही देत आहेत.