जुन्या गाडीपासून घरीचेे छत बनविण्यात आल्याचे सांगितल्यास कोणालाही लवकर विश्वास बसणार नाही. पण लखनौस्थित हिमालयन इंस्टीट्यूट आॅफ अल्टरनेटिव्हजमध्ये सोनम वांगचुक यांनी हा अनोखा कारनामा करून दाखविला आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये वेगळी छाप सोडणाऱ्या ‘थ्री इडियटस’ चित्रपटातून चर्चेत आलेले सोनम वांगचुक यांचे पात्र पुन्हा एकदा प्रकाशझोतत आले आहेत. सोशल माध्यमांवर नेहमी सक्रिय राहणारे महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

महिंद्राचे अधक्ष आनंद महिंद्रा यांनी जुन्या गाडीपासून बनवलेल्या घराच्या छताचे फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माझ्या एक मित्राने लडाखमधून सोनम वांगचुक यांच्या हिमालयन इंस्टीट्यूट आॅफ अल्टरनेटिव्हजमधील काही फोटो पाठवली आहेत. महिंद्रा कारचा एक घराच्या छताच्या स्वरूपात पुर्नवापर करण्यात आला आहे. या संस्थेमध्ये ही एक जीवनाची पद्घत आहे, ज्याठिकाणी कोणतीही वस्तू वाया जात नाही. हे खूप जास्त क्रिएटिव्ह आहे, असे ट्विट महिंद्रा यांनी केले आहे. सोनम वांगचुक यांच्या कल्पनेने महिंद्रा हे किती प्रभावित झाले आहेत हे त्यांच्या ट्विटवरून दिसत आहे.


या अनोख्या कल्पनेचा सोशल माध्यमावर व्यापक पातळीवर कौतुक केले जात आहे. एक युजर्सने म्हटले आहे की महिंद्राच्या जुन्या कारचा वापर फक्त छतासाठी नाही तर घरातील दुसरे फ्लोअर बनविण्यासाठी देखील करण्यात आले आहे. अन्य एका युजर्सने महिंद्राच्या एसयूव्हीद्वारे मजबूत छत बनविण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी सोनम यांची स्तुती करताना त्यांना सुपरक्रिएटिव्ह म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे थ्री इडियट्स मध्ये अभिनेता अमिर खानने सोनम वांगचुकचे पात्र साकारले होते. वांगचुक आजही आपल्या संस्थेच्या माध्यमातून लडाखमध्ये विविध कामे करत असतात.