महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल नेटवर्किंगवर अ‍ॅक्टीव्ह आहेत. अगदी व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या फोटोंपासून सुविचारांपर्यंत अन् वेगवेगळ्या कल्पना ते ट्विटवरुन मांडत असतात. अनेकदा त्यांनी केलेले ट्विट व्हायरल झाल्याचे पहायला मिळते. लोकांनी केलेले जुगाडही आनंद महिंद्रा आपल्या ट्विटरवर पोस्ट करत असतात. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये बजाज बाइकच्या साह्याने मक्याचे कणीस सोलण्याचा देशी जुगाड दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी जुगाडाचं कौतुकही केलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या एक मिनिटाच्या व्हिडीओत तीन ते चार जण बजाज बाइकच्या मदतीने मक्याचे कणीस सोलत असल्याचं दिसत आहे. बाइकला मधल्या स्टँडवर उभं करुन सुरु केलं आहे. पाठीमागील चाकाच्या मदतीनं नंतर मक्याचे कणीस सोललं जात आहे. बाइकचे मागील टायर एखाद्या मशीनसारखं काम करत आहे. एकदम सहजपणे मक्याच्या कणसाचे दाणे निघत आहेत.

या व्हिडीओला पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये असे लिहलेय की, “देशातील शेतकरी बाइक आणि ट्रक्टरला मल्टी-टास्किंग मशीनमध्ये बदलत असलेल्या क्लिप मला मिळत आहे. इथेही याप्रकरेच बाइकचा वापर करण्यात आला आहे. याबाबत मी स्वप्नातही विचार केला नसेल. ”


आनंद मंहिद्रा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.