थायलंडच्या सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या वाईल्ड बोर संघाची काही दिवसांपूर्वी सुटका करण्यात आली. या मुलांना रुग्णालयातूनही डिस्चार्ज देण्यात आला. ही मुलं गुहेतून सुखरूप बाहेर यावी यासाठी जगभरातील लोकांनी प्रार्थना केल्या. या संघातील लहान फुटबॉलर्सना क्रोएशियानं खास भेट पाठवली आहे.

क्रोएशिया फुटबॉल फेडरेशननं या मुलांना क्रोएशिया फुटबॉल संघाच्या जर्सी भेट म्हणून पाठवून दिल्या आहे. गुहेतून बाहेर आलेल्या मुलांना फिफाच्या अध्यक्षांनी फिफाचा अंतिम सोहळा पाहण्याचं आमंत्रण दिलं होतं. मात्र उपचार सुरू असल्यानं या मुलांना काही रशियात जाऊन सामना पाहता आला नाही. नुकतीच ही मुलं पत्रकार परिषदेनिमित्त समोर आली त्यावेळी त्यांना फिफा वर्ल्ड कपविषयी काही प्रश्न विचारण्यात आले.  एका मुलानं आपण फ्रान्सविरुद्ध क्रोएशिया अंतिम सामना पाहिला आमच्यातले काही लोक क्रोएशिया संघाला पाठिंबा देत होते असंही म्हणाले.

आम्ही गुहेतून बाहेर येणे म्हणजे चमत्कार, सुटकेनंतर पहिल्यांदाच मुले आली सर्वांसमोर

मुलांची ही प्रतिक्रिया ऐकताच क्रोएशिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष डोवर सुकर यांनी लगेचच फुटबॉल संघाच्या जर्सी या मुलांना भेट म्हणून दिल्या. या मुलांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी तसेच प्रेम व्यक्त करण्यासाठी क्रोएशियानं जर्सी पाठवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.