जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू होतं, पण यावेळी इमारत चुकीच्या दिशेला कोसळली आणि शेजारच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं.
करायला गेलं एक अन् झालं भलतंच असा काहीसा प्रकार डेन्मार्कमध्ये गेल्या आठवड्यात पाहायला मिळाला. उंच अन् जुनी इमारत आधुनिक पद्धतीनं पाडण्याचं काम येथे सुरू होतं. ही इमारत ज्या ठिकाणी कोसळणं अपेक्षित होती तिथे न कोसळता शेजारीच असलेल्या ग्रंथालय आणि सांस्कृतीत केंद्राच्या इमारतीवर कोसळली. त्यामुळे या ग्रंथालयाचंही मोठं नुकसान झालं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाचा : अंतराळातल्या पहिल्या वहिल्या आलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च माहितीये?

डेन्मार्कमधील एका इमारतीला स्फोटकांच्या साह्यानं उडवण्यात येणार होतं. ही इमारत त्याच जागेत सरळ दिशेत कोसळणार होती. इमारत कोसळताना पाहाण्यासाठी शेकडो लोक परिसरात जमले होते. पण दुर्दैने ठराविक दिशेत इमारत न कोसळता ती विरुद्ध दिशेला असणाऱ्या ग्रंथालय आणि सांस्कृतीत विभागाच्या केंद्रावर कोसळली. त्यामुळे याही इमारतीचं मोठं नुकसान झालं. संपूर्ण परिसरात धुळीचे लोट, इमारतीचे भग्न अवशेष पसरले होते.  ही इमारत पाडण्याची जबाबदारी किनेथ व्हेगी या अभियांत्रिकाच्या खांद्यावर होती. ही दुर्दैवी घटना घडल्यापासून माझी झोप कुठच्या कुठे पळून गेली असल्याचं ते म्हणाले.

वाचा : ….तर ते ७० भटके कुत्रे कोट्यधीश होतील