News Flash

रुग्णालयाच्या ढिम्म कारभारामुळे वडिलांवर मुलाचे शव वाहून नेण्याची वेळ

रुग्णवाहिका नसल्याने खांद्यावरून शव वाहून नेले

उदयवीर हे आपल्या १५ वर्षीय मुलाला घेऊन इटावा जिल्हा रुग्णालयात आले होते.

काही महिन्यांपूर्वी खांद्यावरून आपल्या पत्नीचे शव वाहून नेण्याची वेळ ओडीशाच्या दाना मांजीवर आली होती. रुग्णालयाने पत्नीचे शव घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका पुरवण्याची साधी माणुसकीही दाखवली नव्हती. या घटनेने सारे जग हळहळले होते. ही घटना अजूनही आपण विसरलो नाही तोच उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये असाच एक दुर्दैवी प्रकार घडला आहे. आपल्या पंधरा वर्षीय मुलाचे शव खांद्यावरून वाहून नेण्याची दुर्दैवी वेळ या पित्यावर आली.

उदयवीर हे आपल्या १५ वर्षीय मुलाला घेऊन इटावा जिल्हा रुग्णालयात आले होते. मुलाचे पाय दुखत असल्याने उदयवीर यांनी आपला मुलगा पुष्पेंद्र याला इटवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण इथल्या डॉक्टरांनी मात्र त्यांच्यावर इलाज करण्यासाठी हलगर्जीपणा दाखवला. इथल्या डॉक्टरांनी आपल्या मुलावर योग्य ते उपचार न करताच त्याला मृत घोषीत केले असा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर मुलाचे शव तातडीने घरी घेऊन जाण्याचेही त्यांना डॉक्टरांनी सांगितले. उदयवीर यांचे घर रुग्णालयापासून ७ किलोमीटर लांब होते. पण तरीही रुग्णालयाने शव घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका पुरवण्याइतकीही माणूसकी दाखवली नसल्याचाही आरोप त्यांनी केला. रुग्णालयाच्या या बेजबाबदार वागण्यामुळे आपल्याच मुलाचे शव खांद्यांवर लादून ते प्रत्येकाकडे मदतीची याचना करत होते. पण रुग्णालय परिसरात असलेल्या एकालाही पाझर फुटला नाही. शेवटी मुलाचे शव खांद्यावरून घरी नेण्याचे त्यांनी ठरवले. सुदैवाने एका मोटार चालकाने त्यांना मदत केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.

हा संपूर्ण प्रकार माणूसकीला काळीमा फासणारा आहे. उदयवीर यांना अशा प्रकारे वागणूक देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्य वैद्यकिय अधिकारी राजीव यादव यांनी सांगितले. तर दुसरीकडे मात्र उदयवीर यांचा मुलगा आधीच मृत पावला होता तसेच त्यांनी रुग्णवाहिका मागितलीची नव्हती असे सांगत इथल्या डॉक्टरांनी या प्रकरणातून आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 5:57 pm

Web Title: father carries his 15 year old son body over his shoulder in uttar pradesh
Next Stories
1 नवरदेवाने स्वत:च्या लग्नात पैसे मोजून बोलावले वऱ्हाडी!
2 Video : स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने वाचवले मांजरीच्या पिलाचे प्राण!
3 विराट म्हणतोय, कोणी इतकं गोंडस कसं असू शकतं?
Just Now!
X