News Flash

VIRAL VIDEO : हॉरर मूव्ही सुरु असताना टीव्हीतून बाहेर आले भूत

जीव मुठीत घेऊन ग्राहकांनी पळ काढला

VIRAL VIDEO : हॉरर मूव्ही सुरु असताना टीव्हीतून बाहेर आले भूत
( छाया आणि व्हिडिओ सौजन्य : रिंग्स/ फेसबुक )

एखादा हॉरर मूव्ही बघताना टीव्ही मधल्या भूताने बाहेर येऊन तुमचा गळा पकडला तर? आता तुम्ही म्हणाल असं कुठे होत का? फार फार तर एखाद्या हॉलीवूड किंवा बॉलीवूड चित्रपटात अशी दृश्य दाखवली जातात. प्रत्यक्षात भूत टीव्हीमधून बाहेर कसे बरं येईल. आता तुम्हालाही या गोष्टीवर विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल व्हिडिओ बघा! मोफत टीव्ही जिंकण्याच्या आशेने काही लोक टीव्हीच्या दुकानात शिरले. अन् त्याचवेळी टीव्हीवर सुरू असलेल्या हॉरर मूव्हीमधले भूत चक्क टीव्हीतून बाहेर आले. या भुताला पाहून लोकांची अशी काही घाबरगुंडी उडाली की मोफत टीव्हीचा नाद नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली.

वाचा : सावधान! ‘रिलायन्स जिओ’च्या नावे आलेला संदेश तुम्हाला अडचणीत आणू शकतो

वाचा : आपण यांना पाहिलंत का?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोफत टीव्ही जिंका! या जाहिरातीला भुलून काही ग्राहक टीव्हीच्या दुकानात शिरले. या दुकानात खूप टीव्ही प्रदर्शनासाठी लावले होते. या टीव्हीवर हॉरर मूव्ही सुरू होता. दुकानात आलेले लोक टीव्ही बघण्यात दंग होते. एवढ्यात टीव्हीची स्क्रिन तोडून त्यातून भूत बाहेर येते. लांब सडक केसांनी चेहरा झाकलेल्या आणि उलट्या पायावर चालणा-या या भूताला बघून मोफत टीव्ही मिळणार या आशेने आलेल्या लोकांची अशी काही घाबरगुंडी उडाली की लोकांनी येथून पळ काढला.

भूताटकी नसली तरी अनेकदा हॉरर मूव्ही पाहिलेत की एक अनामिक भिती वाटू लागते. या लोकांच्या बाबातीतही असेच झाले. खर तर हा प्रँकचा प्रकार होता. रिंग या चित्रपटाच्या सिक्वल येत आहे आणि या चित्रपटाची अशा अनोख्या पद्धतीने प्रसिद्धी करण्यात आली. फेसबुक पेजवर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 7:53 pm

Web Title: ghostly girl came out of the tv set
Next Stories
1 आपण यांना पाहिलंत का?
2 पॉकेट मनी खर्चून अपंग मैत्रिणीसाठी विद्यार्थ्यांनी खरेदी केली व्हीलचेअर
3 Viral Video : अन् डोनाल्ड ट्रम्पही म्हणू लागले ‘मित्रों’
Just Now!
X