16 January 2021

News Flash

RJD म्हणतं तेजस्वी यादवांमुळे विराटचं नशिब बदललं, नेटकरी म्हणाले निवडणूका जिंकण्यासाठी काहीही…

सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वार जोरदार वाहत आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारसभेदरम्यान सत्ताधारी जदयू-भाजपा आणि विरोधी पक्षातील राजद यांच्यात लढत रंगणार आहे. राजदची कमान यंदा लालुप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे असून ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्व पक्ष वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.

या निमीत्ताने राजद पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक बातमी शेअर केली ज्यात तेजस्वी यादवांमुळे विराट कोहलीचं नशिब बदललं असं नमूद केलं आहे. या बातमीत लिहील्याप्रमाणे १६ वर्षाखालील संघाकडून खेळत असताना तेजस्वी यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विराटचा खेळ पाहून निवड समिती प्रभावित झाली होती.

राजदचं हे ट्विट पाहून सोशल मीडियावर मात्र नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच टर उडवली आहे. पाहूयात नेटकऱ्यांनी शेअर केलेली भन्नाट मिम्स…

सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्व करणारा कोहली आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 6:07 pm

Web Title: how netizens responded after rjd claimed virat kohlis fate changed thanks to tejashwi yadav psd 91
Next Stories
1 निकालाआधीच ट्रम्प यांची आवराआवर सुरु… ‘व्हाइट हाऊस’समोरील फोटो ठरतोय चर्चेचा विषय
2 ट्रम्प यांनी संतापून केलेलं ‘ते’ तीन शब्दांचं ट्विट ठरतयं मस्करीचा विषय
3 फॅशन का जलवा ! चहलच्या होणाऱ्या बायकोचा ब्लॅक ड्रेसमधला हॉट लूक पाहिलात का??
Just Now!
X