News Flash

जेवलीस का?? मैदानावर असतानाही गरोदर अनुष्काची विराट घेतोय काळजी, हा व्हिडीओ जरुर पाहा…

विराटच्या संघाला सपोर्ट करायला अनुष्काही युएईत

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी RCB ला फक्त एका विजयाची गरज आहे. बुधवारी मुंबईविरुद्ध सामन्यात RCB ने हा विजय मिळवला तर प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करणारा तो पहिला संघ ठरेल. विराटची पत्नी अनुष्का देखील त्याच्यासोबत युएईत आहे. अनुष्का लवकरच आई बनणार असल्यामुळे विराट एका चांगल्या नवऱ्याची भूमिका निभावत बायकोची काळजी घेताना दिसत आहे.

सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात विराट मैदानावर उभा असताना स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काला खुणावून जेवलीस का ?? असं विचारताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरही त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी विराटचा संघातील सहकारी एबी डिव्हीलियर्सने विरुष्काचा एक रोमँटीक फोटो काढला होता. इन्स्टाग्रामवर या फोटोला नेटकऱ्यांनी तूफान प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदा विराटचा RCB संघ आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 1:30 pm

Web Title: ipl 2020 viral video virat asking anushka if she had lunch during match psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 गुगलची प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल; पाच वर्षांत प्लास्टिक पॅकेजिंग पूर्णपणे करणार बंद
2 शेजारी लग्नाला आलेली स्थळं परत पाठवत होता, तरुण जेसीबी घेऊन पोहोचला आणि….
3 Fact Check : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी न मिळाल्यानंतर रोहितने ट्विटर Bio बदलला?? काय आहे सत्य…
Just Now!
X