कुटुंबातील संख्या वाढू लागली की त्यांची घरं वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. यावर उपाय म्हणून केरळमधील Kodungallur नगर पालिकेनं एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. घराच्या आवारात दोन झाडे लावली तरच नोंदणी होणार असा निर्णय Kodungallur नगरपालिकनं घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. असा निर्णय घेणारं हे भारतातील पहिलेच शहर आहे.

Kodungallur नगर पालिकेच्या आवारात जर घर बांधायचे असेल तर कमीत कमी दोन झाडे लावणं बंधनकारक केलं आहे. जर झाडे नसतील तर घराची नोंदणी होणार नाही असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

घराची नोंदणी होण्यापूर्वी Kodungallur नगर पालिकेचे आधिकारी तेथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आंबा आणि फणसाचीच झाडे लावणं नगरपालिकेनं बंधनकारक केलं आहे. १५०० स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा आधिक मोठ्या असणाऱ्या घरांमध्ये कमीतकमी दोन झाडं असणं बंधनकारक आहे.

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूसारख्या शहरांनी Kodungallur या शहराचा आदर्श घ्यावा, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहे.