तो केवळ १६ वर्षांचा आहे, त्याला पुस्तक वाचायला आवडतात, इयत्ता बारावीचा विद्यार्थी असून तो हळुवार बोलतो परंतु तो सामान्य मुलगा नाही. कारण त्याची उंची चक्क ७ फुट ४ इंच तर वजन तब्बल ११३ किलो आहे. हे वर्णन आहे उत्तराखंडातील पिथौरागडच्या मोहन सिंह असे नाव असलेल्या मुलाचे. त्याची असाधारण उंची व वजनाचे कारण आहे त्याला झालेला दुर्लभ असा ब्रेन ट्युमर. अशातच त्याच्यावर एआयआयएमएस येथे शस्त्रक्रिया पार पडली आहे. यानंतर त्याचे वजन कमी झाले मात्र उंची कायमच आहे.

उत्तरखंडमधील बारावीत शिकणारा मोहन माधव सिंग गेल्या पाच वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रेन ट्युमरमुळे त्याच्यामध्ये बराच शारिरीक बदल झाला. त्याची उंची सात फूट चार इंच ऐवढी झाली तर वजन ११३ किलो झालं आहे. गिनिज बुकनुसार २९ वर्षीय सुलतान कोसेन जगातील सर्वात उंच व्यक्ती असून त्याची उंची ८ फूट तीन इंच इतकी आहे. १६ वर्षीय मोहन सिंगची नुकतीच एआयआयएमएसमध्ये सर्जरीद्वारे त्याचा ट्युमर काढण्यात आला. सर्जरीनंतर मोहनच वजन कमी झालं आहे. पण त्याची उंची तेवढीच आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये मोहन चर्चेचा विषय आहे. जिथे जातो तेथील लोकांच लक्ष वेधून घेतो. मोहनची वाढची उंची पाहून मी आनंदी असल्याचे वडिल माधव सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मोहनसाठी आम्ही सरोजीनी नगरमधून मोहनसाठी आण्ही फोर एक्स एल मापाचे कपडे मागवले आहेत. त्याला बाथरूमध्येही बसता येत नाही. त्याच्यासाठी आम्ही मेरूतच्या कंपनीमधून बूट मागवले आहेत. असेही माधव सिंग म्हणाले.