28 November 2020

News Flash

कृतीमधून दाखवून दिलं… अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी रोहित पावर धावले

फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आमदार असावा तर असा...

कर्जत जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. रोहित पवार यांना आपली गाडी थांबवून अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले आहेत. रोहित पवार यांनी स्वत: काट्यात गेलेली अपगातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली. रोहित पवार यांचं हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

मांडवे- पिंगळी (ता.माण) यादरम्यान बुधवारी दहिवडीतील काटकर या शेतकऱ्याचा अपघात झाला होता. दामोदर काटकर यांची व्हॅन अपघातानंतर रस्त्याच्या खाली काट्यामध्ये गेली होती. हा प्रकार आमदार रोहित पवार यांनी पाहताच गाडी थांबवत अपघातस्थळी धाव घेत, काटकर यांची चौकशी करत आधार दिला. घटनेचं गांभीर्य ओळखत रोहित पवार यांनी सहकाऱ्याच्या साह्यानं तात्कळ मदत केली.

या अपघातामध्ये शेतकरी काटकर जखमी झाले आहेत. रोहित पवार यांनी तात्काळ त्यांची रुग्णालयात जाण्याची सोय केली. रोहित पवार यांनी शेतकऱ्याची व्हॅन उपस्थितांच्या मदतीने आमदार पवार यांनी ढकलत रस्त्यावर आणली.  रोहित पवार यांच्या या सामाजिक बांधिलकीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून त्यांच्या या मदतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. एका चाहत्यांनी रोहित पवार यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रसंगाचे वर्णन केलं आहे. यावर रिप्लाय देताना रोहित पवार यांना सामाजिक संदेशही दिला आहे.


रोहित पवार म्हणाले की, पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं माझं आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 1:30 pm

Web Title: ncp mla rohit pawar help farmer in satara nck 90
Next Stories
1 “नग्नतावादी आणि मास्क न घालणारे सारखेच, आपण एखाद्याला पॅण्ट घालायला सांगतो तेव्हा…”; बिल गेट्स संतापले
2 कुत्र्याचं नाव गोवा असं का ठेवलं?; रतन टाटांनी त्या कमेंटला दिला रिप्लाय
3 पोप फ्रान्स‍िस यांनी ‘लाइक’ केला बिकिनी घातलेल्या मॉडेलचा फोटो, सोशल मीडियावर खळबळ
Just Now!
X