दोन मिनिटात तयार होऊन झटपट भूक भागवणाऱ्या मॅगीच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण नेस्ले इंडियाने ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. नेस्लेने मॅगी नूडल्ससाठी विशेष ‘रिटर्न स्कीम’ सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ऑफरनुसार, आता तुम्ही मॅगीची 10 रिकामी पाकिटं दुकानदाराला परत केलीत तर तुम्हाला मॅगीचं एक भरलेलं पाकिट अगदी मोफत मिळणार आहे. सध्या देहरादून आणि मसूरीमध्ये ही स्कीम सुरू आहे. मात्र, लवकरच देशातील इतर राज्यांमध्ये ही स्कीम सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. देहरादून आणि मसूरीमध्ये कंपनीचे जवळपास 250 रिलेटर्स आहेत, या सर्व रिटेलर्सकडून ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

प्रदूषणाचा धोका लक्षात घेत नेस्ले इंडियाने हे पाऊल उचलले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच प्लास्टिकचा कचरा कमी होण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांमध्येही पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होईल असा विश्वास नेस्ले इंडियानं व्यक्त केला आहे. तसंच, व्यापाऱ्यांचाही फायदा होईल असं कंपनीने म्हटलं आहे. तर, रिकाम्या पाकिटांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ‘इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशन’ची असणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nestle india offer exchange 10 maggi empty packs for one fresh packet
First published on: 15-11-2018 at 14:57 IST