IPL 2024: आयपीएलची सध्या जितकी चर्चा आहे, तितकीच चर्चा ‘ड्रीम ११’ या शब्दाची आहे. आयपीएल 2024 सुरू झालं की लोकांची पाऊल आपोआप ड्रीम 11 कडे वळतात. ड्रीम 11 वर ४९ रुपये लावून आपणही करोडपती व्हावं असे अनेक जण प्रयत्न करत असतात. यामध्ये मागच्या काही दिवसांत अनेकांना कोट्यावधी रुपये जिकल्यांच्या आपण बातम्या ऐकल्या आहेत. दरम्यान यासाठी तरुणाई वेडी झाली आहे. दिवस दिवस तरुण ड्रीम 11 मध्ये टीम लावून खेळत असतात. दरम्यान एका तरुणानं तर हद्दच केली. त्यानं आयपीएलदरम्यान ड्रिम ११ वर टीम लावायला वेळ मिळत नाही म्हणून नोकरीचा थेट राजीनामा दिलाय. तरुणानं आपल्या बॉसला लिहलेल्या राजीनाम्याचं पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे लेट वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

ड्रीम 11 ही एक मुंबईस्थित फॅन्टसी गेमिंग कंपनी आहे. भारतातील टॉप १० नाविन्यपूर्ण कंपन्यांपैकी ड्रीम ११ ही एक आहे. ड्रीम 11 स्टार्ट अप कंपनीची सुरुवात एक वेबसाईट म्हणून २००८ मध्ये हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी केली होती. भारतातील क्रिकेटची लोकप्रियता लक्षात घेऊन ही कंपनी सुरु करण्यात आली होती. अल्पावधीतच या कंपनीची क्रेझ खूप वाढली. वेबसाइटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे २०१६ मध्ये Dream11 मोबाईल ॲप तयार करण्यात आले. आज या ॲपचे कोट्यवधी युजर्स आहेत. ड्रीम 11 ॲपवर तुम्ही क्रिकेटसह फुटबॉल, हॉकी, कबड्डी यांसारख्या खेळांमधील सामन्यांसाठी दोन्ही संघातील खेळाडू एकत्र करून तुमची फॅन्टसी टीम तयार करू शकता. यातून तुम्हाला तुमच्या पॉईंट्सनुसार बक्षीस मिळू शकते. आता या तरुणानं राजीनामा लेटरवर नेमकं काय लिहलंय हे पाहू.

हे पत्र वाचून तुम्ही हसून हसून लोट-पोट व्हाल. ” प्रिय बॉस, विषय : राजीनामा देण्याबाबत. सर अॅक्चुली विषय कसा ह? माहिती ह का? सध्या आयपीएल सुरु आबे आणि मला Dream 11 वर टिम बनवाला लगतान. तुमच्या या कामामुळे माझा Dream 11 वर नीट फोकस नाय होत. म्हणून तुम्ही माझ्या जागी दुसरा पोऱ्या बघा. मी उद्यापासून नाय येणार. Bye, GN, AD,TC. तुमचा पर्सनल व भविष्यातला करोडपती – नाव – शुभम” असं पत्र या तरुणानं लिहलं आहे.

पाहा तरुणाचं राजीनामा पत्र

हेही वाचा >> पुणेकर आजोबा काही ऐकेनात! मतदानाला गेले; पण कमळाचं चिन्हच दिसेना, मतदान केंद्रावरच संतापले VIDEO व्हायरल

राजीनामा पत्राचा हा फोटो theaagrikolitales नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोला हजारो लाईक्स आणि वेगवेगळ्या कमेंट नेटकरी करत आहेत.