News Flash

फोटोसाठी काय पण… ; लस घेताना मास्क न घातल्यामुळे मोदींवर नेटकरी संतापले

मोदींनी सकाळी सात वाजता घेतली लस, त्यानंतर लस घेतानाचा फोटोही केला पोस्ट

(Photo: Twitter)

देशामध्ये आजपासून करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी सात वाजताच दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला. मोदींनी लस घेतानाचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मोदींसोबत दोन नर्सही दिसत आहेत. लस घेताना मोदी हसत असल्याचे या फोटोत दिसत आहे. मात्र लस घेताना मोदींच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली त्यांनी मास्क न घातल्याबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लस घेताना मास्क घातलेला हे दाखवणारा फोटोही पोस्ट केलाय.

नक्की वाचा >> …म्हणून मोदींनी सकाळी सात वाजताच घेतली लस; जाणून घ्या या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’

मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला करोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

मोदींनी पोस्ट केलेल्या या फोटोखाली अनेकांनी पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता असं म्हटलं आहे. तर काहींनी फोटोसाठी मोदींनी मास्क काढल्याची टीका केलीय.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

दरम्यान, मोदींनी एवढ्या सकाळी येऊन का लस घेतली यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी लस देणाऱ्या नर्सचे नाव पी निवेदिता असं होतं. तसेच नरेंद्र मोदींनी सकाळी सातच्या सुमारास एम्सला भेट दिली कारण सर्वसामान्यांना पंतप्रधानांच्या भेटीमुळे काही अडचण होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच मोदींच्या या लसीकरणासंदर्भातील भेटीदरम्यान विशेष मार्ग तयार करणे आणि वाहतुक नियंत्रणासंदर्भातील इतर गोष्टी टाळण्यात आल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 9:03 am

Web Title: pm modi shares photo of his vaccination faces criticism for doing away with face mask scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘इम्रानवरही बनव’, आपल्यासारखं फाडफाड इंग्रजी शिकवणाऱ्या पाकिस्तानी कॉमेडियनला शशी थरूर यांचा रिप्लाय
2 ‘एक मार्चपासून दूध १०० रुपये लीटर’; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार
3 पंजाबच्या गृहिणीचं रातोरात नशीब फळफळलं, १०० रुपयांच्या लॉटरी तिकीटावर जिंकले एक कोटी रुपये
Just Now!
X