भूक क्षमवण्यासाठी कोणताही प्राणी काहीही करू शकतो. अगदी पोटातली भूक चोरी करण्याची वाईट वेळ एका माणसावर आणू शकते. तर आपली भूक क्षमवण्यासाठी कधी कधी प्राणी आपल्याच पिल्लांवर तुटून पडल्याचे अनेक किस्से तुम्ही वाचले असतील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उंदीर किंवा छोटे प्राणी, बेडूक, पक्षी हे सापांचे प्रमुख खाद्य. पण सापाच्या काही मोजक्या प्रजाती अशाही आहेत की त्या इतर प्रजातींच्या सापाची शिकार करतात. पण सगळ्यांचा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी इस्टर्न ब्राऊन प्रजातीच्या सापाने चक्क एका अजगराला गिळले. इस्टर्न ब्राऊन साप विषारी आहे पण तो फक्त बेडूक किंवा पक्ष्यांची शिकार करतो, त्यामुळे त्याच्या अशा अनपेक्षित शिकारीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Viral : कॉपीला आळा घालण्यासाठी चिनी शिक्षकांनी शोधला रामबाण उपाय

ऑस्ट्रेलियामध्ये अनेक विषारी प्रजातीचे साप आढळतात. त्यातली इस्टर्न ब्राऊन ही सर्वात विषारी प्रजाती आहे. हा साप चावून कित्येकाचा मृत्यू झाल्याच्या घटना ऑस्ट्रेलियात घडल्या आहेत. हा साप बेडूक, छोटे पक्षी आणि प्राण्याची शिकार करतो. हे त्याचे मुख्य खाद्य आहे. पण, एका अजगराला सापाने गिळण्याचा हा प्रकार दुर्मिळच. हा साप पकडण्यासाठी आलेल्या सर्पमित्रांनी हा व्हिडिओ काढला. नंतर या सापला त्यांनी पिशवीत भरून सुरक्षित स्थळी नेले.

इस्टर्न ब्राऊन ही ऑस्ट्रेलियातील दुस-या क्रमांकाची विषारी प्रजाती आहे. हा साप चावल्याने अनेकांचा मृत्यू होतो. सर्वाधिक मृत्यू तर हे साप पकडणा-या सर्पमित्रांचेच होतात. एकमेकांनाच खाणा-या सापच्या काही प्रजाती आहे. पण इस्टर्न ब्राऊन सापाच्या प्रजातीचा त्यात समावेश होत नाही. त्यामुळे अशा दुर्मिळ घटनेने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्क बसला.