17 July 2019

News Flash

सॅमसंगनेच केले आयफोनवरून ट्विट आणि…

यामुळे कोणाची तरी नोकरी गेल्याची नेटकऱ्यांना शंका

ट्विटमुळे सॅमसंग ट्रोल

सोशल मिडियावर दोन बड्या ब्रॅण्ड्समध्ये होणारी शाब्दिक चकमक आता नेटकऱ्यांसाठी नवीन राहिलेली नाही. सामान्यपणे एकमेकांवर कुरघोडी करताना हे ब्रॅण्ड्स प्रतिस्पर्धी कंपनीला चांगलेच ट्रोल करतात. मात्र सॅमसंगने नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे त्यांनी स्वत:लाच ट्रोल करुन घेतले आहे.

झाले असे की सॅमसंगने नुकताच लॉन्च केलेल्या एका नवीन फोनच्या जाहिरातीचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केला. मात्र हे ट्विट सॅमसंगचे ट्विटर हॅण्डल संभाळणाऱ्या कोणीतरी चक्क आयफोनवरून केले आहे. आणि स्मार्ट नेटकऱ्यांनी सॅमसंगच्या ट्विटवर अकाऊण्टवरून आलेल्या ट्विटखालील via Twitter For iPhone या नोटीफिकेशनवरून सॅमसंगला चांगलेच ट्रोल केले आहे.

ट्विटवरून ब्लॉगर असणाऱ्या मार्क्यूज ब्राऊनली याने सॅमसंगच्या अकाऊण्टवरून आयफोन वापरून ट्विट झाल्याची गोष्ट सर्वात आधी ट्विटवर स्क्रीनशॉर्ट शेअर करत सांगितली. याआधीच मार्क्यूजने काही महिन्यांपूर्वी अनुष्का शर्माने गुगल पिक्सलचा प्रमोश्नल व्हिडीओ आयफोनवरून ट्विट केल्याचे निर्दर्शनास आणून दिले होते. तसेच त्याने यांदाही ट्विट करत सॅमसंगच्या ट्विटसंदर्भातील आयफोन कनेक्शन नेटकऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

मार्क्यूजने हा स्क्रीनशॉर्ट ट्विट केल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये सॅमसंगच्या ज्या ट्विटर अकाऊण्टवरून हे ट्विट करण्यात आले होते ते ट्विटर अकाऊण्टच डिलीट करण्यात आले. याचाही स्क्रीनशॉर्ट मार्क्यूजने ट्विटवरून शेअर केला.

या सगळ्या पंधरा मिनिटांच्या गोंधळात मार्क्यूजची ट्विटवरील लोकप्रियता आणि व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉर्टमुळे अनेकांनी ‘चुकीला माफी नाही’ म्हणत सॅमसंगला चांगलेच ट्रोल केले. पाहुयात त्यापैकी काही निवडक ट्विट…

सॅमसंगचे इतके ट्विट झाले आयफोनवरून…

चोरी पकडली गेली

काय हे सॅमसंग

अरेरे…

आयफोनची सर्वोत्तम जाहिरात

आणि पंधरा मिनिटांनंतर ज्या अकाऊण्टवरून हे ट्विट करण्यात आले ते अकाऊण्टच डिलीट करण्यात आले. त्यावरूनही नेटकऱ्यांनी सॅमसंगवर चांगलीच टिकेची झोड उठवली.

अकाऊण्टच नसेल तर चुकीचे ट्विटच करणार नाही

सॅमसंगने असा सोडवला प्रश्न

अकाऊण्ट डिलीट… बाय बाय…

अकाऊण्ट डिलीट करणे म्हणजे असेच काहीतरी झाले

उपाय…

…आणि कोणाची तरी नोकरी गेली

एकीकडे सॅमसंग ट्रोलर्सच्या निशाण्यावर अलेले असतानाच या पुढे अशी चूक होणार नाही यासाठी कंपनी काहीतरी उपाय योजना नक्की करेल अशी अपेक्षाही नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

First Published on December 4, 2018 11:41 am

Web Title: samsung used an iphone to tweet their new phone gets trolled