News Flash

Video : आयला ! सोनू निगम ढिंच्याक पूजाचा फॅन?

सोनूने गायलं 'दिलो का शूटर'

ढिंच्याक पूजाचे सगळे व्हिडिओ तिच्या यूट्यूब अकाऊंटवरून काढून टाकण्यात आलेत

सध्या ढिंच्याक पूजा चांगलीच चर्चेत आलीय, आता तिचं आणखी एखादं नवं गाणं वगैरे आलंय की काय असा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल. पण घाबरून जाऊ नका! पुढचे काही दिवस, महिने किंवा कदाचीत वर्षंदेखील तुम्हाला ढिंच्याक पूजाचा आवाज ऐकावा लागणार नाही. कारण मंगळवारीच ढिंच्याक पूजाचे सगळे व्हिडिओ तिच्या यूट्यूब अकाऊंटवरून काढून टाकण्यात आलेत. तेव्हा कालपासून ही पूज जरा जास्तच चर्चेत आलीय.

वाचा : म्हणून ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आले

पण असो, या गोष्टीचं तिला दु:ख असलं तरी एका गोष्टीने ती नक्कीच सुखावली असणार. ती म्हणजे सोनू निगमसारख्या प्रसिद्ध गायकानेही पूजाच्या गाण्याच्या दोन ओळी गायल्या आहेत. त्याने तिचं गाणं गुणगुणण्याचा प्रयत्न केलाय. यातूनतच तिला भरून पावलं असणार हे नक्की. तर सोनूने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केलाय. ‘दिलो का शूटर’ गाणं जर कुमार सोनू यांनी गायलं असतं तर त्याची चाल कशी असती याचा छोटासा डेमो सोनूने फेसबुकवर अपलोड केलाय आणि तो सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होतोय. ढिच्यांक पूजाच्या या गाण्यांमधले शब्द सुमार असले तरी सोनूच्या तोंडून मात्र हे गाणं ऐकताना फारच भारीच वाटतं हे नक्की.‍!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:35 pm

Web Title: sonu nigam sings dhinchak poojas dilon ka shooter in kumar sanu style
Next Stories
1 पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या पेनाची किंमत लाखांच्या घरात?
2 डासांवर गूगल आणि मायक्रोसॉफ्ट शोधणार रामबाण इलाज
3 म्हणून ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आले
Just Now!
X