प्रत्येकाला काहीना काही छंद असतो. कोणाला दुर्मिळ नाणी जमवण्याचा तर कोणला, दुर्मिळ तिकिटे जमवण्याचा. चंढीगढमध्ये राहणा-या नरेंद्र पाल सिंह यांना नोटा जमा करण्याचा छंद होता. ज्या नोटांचा सिरिअल नंबर ७८६ असेल अशा अनेक नोटा नरेंद्र पाल यांच्याकडे आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास १४ लाख रुपये जमवले होते पण मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे मात्र त्यांना हा छंद चांगलाच महागात पडला आहे.

नरेंद्र पाल सिंह यांना ७८६ क्रमांक असलेल्या नोटा जमा करण्याचा छंद फार पूर्वी पासून आहे. ७८६ हा आकडा भाग्यवान आकडा मानला जातो. मुस्लिम समाजातही या आकड्याला विशेष महत्त्व आहे. पाल यांनी १९८९ पासून या नोटा जमावायला सुरूवात केली. भारतात ७८६ आकडा असलेल्या सर्वाधिक नोटा या नरेंद्र पाल यांच्याकडेच आहेत. त्यांच्या नावाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद आहे. त्यांच्याकडे ७८६ हा शेवटचा सिरिअल नंबर असलेल्या ५०० च्या जवळपास ४०० हून अधिक नोट आहेत. तर १००० च्या १०० हून अधिक नोटा आहेत. या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत त्यामुळे नरेंद्र पाल यांचे लाखोंचे नुकसान तर झालेच आहे. पण गेल्या २० वर्षांपासून जमवलेल्या या नोटा आता परत द्याव्या लागणार याचे दु:खही त्यांना झाले आहे. पाल हे पंजाब स्टेट कॉओपरेटिव्ह बँकेत नोकरी करायचे. ७८६ या आकड्यांने त्यांना इतकी भूल घातली आहे की त्यांच्या गाडीचा शेवटचा क्रमांकही ७८६ आहे तर मोबाईल नंबरमधले शेवटचे डिजीटही ७८६ असेच आहे. ७८६आकडा असलेले फक्त भारतीय चलनच नाही तर पाकिस्तान, सिंगापूर, इंग्लड, अमेरिका, थायलँड, कॅनडा अशा अनेक देशांचे चलन त्याच्याकडे आहे.

नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कुठेच या नोटा स्वीकारल्या जात नाही. या जून्या नोटा ३१ डिसेंबरपर्यंत आपल्या जवळच्या बँकेत बदलून घेण्याचे आवाहनही नरेंद्र मोदींनी केले आहे आणि याचा फटका सगळ्यांच बसल्याचे दिसून येत आहे.