देहरादूनमधल्या ‘इंडियन मिलिटरी अॅकॅडमी’च्या रियुनिअनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय. मिलिटरी अॅकॅडमीची कडक शिस्त, नियम हे सगळ्यांनाच माहिती आहेत. या करड्या शिस्तीत सैनिकांची जडणघडण होते. याठिकाणी लागलेली शिस्त सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही सैनिकांच्या अंगी कायम राहते, याची छोटीशी झलक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधून पाहायला मिळाली.

Video: मुकेश अंबानींच्या मुलाच्या व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेचे सत्य

जाणून घ्या २०१७मध्ये भारतीयांनी गुगलवर काय शोधले?

देहरादूनमधल्या इंडियन मिलिटरी अॅकॅडमीच्या रियुनिअन दरम्यान सैन्यातील आजी माजी अधिकाऱ्यांची भेट झाली. यावेळी ८५ वर्षांचे सुभेदार मेजर दरबार सिंगही उपस्थित होते. त्याकाळी मेजर दरबार सिंग इंडियन मिलिटरी अॅकॅडमीतील विद्यार्थ्यांना लष्करी संचलनाचे प्रशिक्षण द्यायचे. रियुनिअननिमित्तानं त्यांची आपल्या पथकाशी पुन्हा गाठभेठ झाली. यावेळी सिंग यांनी आपल्या तरूणपणीच्या आठवणींना उजाळा देत आपल्या पथकाकडून कवायती करून घेतल्या. अर्थात पथकातल्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी आपली साठी ओलांडली होती. या सगळ्यांकडून कवायती करून घेताना ८५ वर्षांच्या सुभेदार मेजर सिंग यांचा उत्साह सळसळून वाहत होता. सिंग यांच्या आदेश पालन करत त्यांच्या पथकानं मैदानात कवायत करून उपस्थितांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.