21 November 2017

News Flash

डरना मना है..!; वणवा लागूनही त्यांचा खेळ सुरूच

कोणी इतक्या शांतपणे कसं खेळू शकतं?

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 11:19 AM

सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे

काही लोक आपल्याच विश्वात किती गुंग असतात ना! आपल्या आजूबाजूला काय सुरूय, काय घडतंय याचा थांगपत्ताही त्यांना नसतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून तुमच्याही ते लक्षात आलं असेल. काही गोल्फपटू वणवा लागला असताना गोल्फ खेळण्यात व्यग्र होते. मैदानाला लागून असलेल्या जंगलात मोठी आग लागली असताना ते मात्र गोल्फच्या मैदानात खेळण्याचा आनंद लुटत होते.

Viral : ‘त्या’ एका फोटोने मुलीचे आयुष्यच बदलले!

मागे अग्नितांडव सुरू असताना कोणी इतक्या शांतपणे कसं खेळू शकतं? असा प्रश्न साहजिकच कोणालाही पडेल. कदाचित हा फोटोशॉप केलेला फोटो असेल असंही अनेकांना वाटलं. पण हा फोटोशॉप केलेला फोटो नसून तो खरा आहे. ओरेगॉनमधल्या बिकन गोल्फ कोर्सवरचा हा फोटो आहे. ख्रिस्टी मॅक्युअर या फोटोग्राफरने तो टिपला आहे. ‘अनेकांना हा फोटो खोटा असल्याचं वाटलं. पण हा फोटो खोटा नसून तो खरा आहे. मागे वणवा लागला असताना देखील खेळाडू गोल्फ खेळण्यात मग्न होते. सुरूवातीला हे पाहून मला धक्काच बसला, असं दृश्य पाहायला मिळणं फारच दुर्मीळ आहे म्हणून मी कॅमेरा बाहेर काढला आणि ते दृश्य टिपलं.’ अशी प्रतिक्रिया ख्रिस्टिने दिली. या फोटोला फेसबुकवर अडीच लाखांहून अधिक लाईक्स तर दीड हजारांहून अधिक शेअर्स मिळाले आहेत.

वाचा : चमत्कार! कोमात गेलेल्या महिलेने दिला सुदृढ बाळाला जन्म

First Published on September 14, 2017 11:07 am

Web Title: viral photo of golfers continue to play game while wildfire blazes behind them