सोशल नेटवर्किंगवर जंगलामधील प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामधील एका व्हिडिओ आणि फोटोची. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर असणाऱ्या ग्यान दिक्षित यांनी मागील वर्षी या उद्यानाला भेट दिली तेव्हा त्यांना हत्तींचा एक कळप नदीकाठी पाणी पिताना दिसला. ग्यान यांनी या कळपाचे काही फोटो काढले आणि व्हिडिओही शूट केला. सध्या हाच फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर कोडं म्हणून व्हायरल होत आहे.

नक्की पाहा >> Best Couple : ‘हे’ दोघं चार वर्षांपासून एकत्र फिरतात; फोटोग्राफरनेच सांगितला व्हायरल फोटोचा किस्सा

दिक्षित यांच्या वाइल्ड लेन्स इको फाउंडेशनच्या ट्विटर हॅण्डलवरुन हा फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत या फोटोमध्ये नक्की किती हत्ती आहेत मोजून दाखवा असं चॅलेंज नेटकऱ्यांना देण्यात आलं आहे. “काही फोटो हे भन्नाट असतात. हा त्यापैकीच एक. एकाच फ्रेममध्ये तुम्हाला सात जण दिसत आहेत, तेही अगदी सिक्रोनाइनज केल्याप्रमाणे,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या फोटोमध्ये वर वर चार हत्ती दिसत असले तरी एकूण सात हत्ती असल्याने अनेकांच्या या फोटोवर उड्या पडल्या आणि उरलेले तीन हत्ती कुठे आणि कसे दडून बसले आहेत याबद्दल कमेंटमध्ये चर्चा सुरु झाली.

१३ जुलै रोजी हा फोटो पोस्ट केल्यानंतर ३० जुलै रोजी याच फोटोसोबत काढण्यात आलेला व्हिडिओही पोस्ट करण्यात आला. “काही दिवसांपूर्वी आम्ही सेव्हन इन वन असा फोटो पोस्ट केला होता. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा,” अशा कॅप्शनसहीत व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही पण बघा हा व्हायरल व्हिडिओ.

नक्की पाहा >> कोणी म्हणतं ब्लॅक ब्यूटी तर कोणी बगीरा… खरोखरच या फोटोंवरुन तुमची नजर हटणारच नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये सात हत्ती दिसले का? नसतील दिसले तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ फ्रेम बाय फ्रेम पाहा म्हणजे उरलेल्या तीन हत्तीचे कोडे नक्की उलगडेल.