25 November 2020

News Flash

‘Idiot’ टाईप केल्यानंतर गुगलवर दिसतेय ‘या’ नेत्याची प्रतिमा

गुगलनं या प्रकरणात लक्ष न घालण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे समर्थकांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे.

‘गुगल’ या सर्वात मोठ्या सर्च इंजिनवर ‘Idiot’ हा शब्द टाकून प्रतिमा शोधल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमा समोर येत आहे. हा धक्कादायक प्रकार नक्कीच ट्रम्प समर्थकांना न रुचणारा आहे. त्यामुळे हा महासत्तेच्या अध्यक्षांचा अपनाम असून त्वरित यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र गुगलनं या प्रकरणात काहीही करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

गुगलमध्ये image search या पर्यायात ‘Idiot’ हा शब्द शोधल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो पहिले दिसत आहे. डोनाल्ड हे अमेरिकन दौऱ्यावर होते त्यावेळी अमेरिकन इडिअट अशा शब्दात काही ब्रिटीश जनतेनं त्यांची हेटाळणी केली. रेडिट युजर्सनं मोठ्याप्रमाणात रेडिटवर ट्रम्प यांचे फोटो ‘इडिअट’ हा शब्द वापरून अपलोड केले. हे प्रमाण इतकं मोठं होतं की याच कारणामुळे गुगलवरदेखील याच नावानं ट्रम्प यांचे फोटो दिसू लागले. ‘दी गार्डिअन’ या वृत्तपत्राच्या माहितीनुसार गुगलनं या प्रकरणात लक्ष न घालण्याचं ठरवलं आहे. गुगलच्या या भूमिकेमुळे ट्रम्प समर्थकांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2018 7:01 pm

Web Title: when you type the word idiot into googles image search trump pictures are the first to appear
Next Stories
1 पडद्यामागे घडलेल्या ‘त्या’ एका गोष्टीमुळे मॉडेलने स्तनपान करत केला रॅम्पवॉक
2 कामाच्या पहिल्याच दिवशी वेळेत पोहोचण्यासाठी ‘तो’ रात्रभर चालला आणि..
3 कारची किल्ली हरवली तर नाकारला जाऊ शकतो विम्याचा क्लेम
Just Now!
X