Kim Jong un bodyguards : सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर आज ( १२ जून २०१८) रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यातील ऐतिहासिक भेट पार पडली. या परिषदेत हुकूमशहा किम जोंग उनच्या संरक्षणाची जबाबदारी ही उत्तर कोरियातील काही खास सुरक्षारक्षकांच्या खांद्यावर होती. किमच्या गाडीभोवती या सुरक्षा रक्षकांनी केलेलं कडं पाहून सगळ्यांनाच त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं आहे.

Donald trump Kim jong Un summit: किम जोंग उन यांचा पहिलावहिला सेल्फी बघितला का?

किमच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले हे सुरक्षारक्षक ‘कोरिअन पिपल्स आर्मी’चा भाग आहेत. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार ‘कोरिअन पिपल्स आर्मी’मधून योग्य उमेदवाराची किमच्या सुरक्षेसाठी निवड केली जाते. तंदुरुस्ती आणि कौशल्याच्या जोरावर त्यांना निवडलं जातं. या सुरक्षारक्षकांनी मार्शल आर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवणं अनिवार्य असतं. याव्यतिरिक्तही दिसणं आणि उंची हे दोन महत्त्वाचे निकष सुरक्षारक्षक निवडताना पाहिले जातात. मार्शल आर्ट्स आणि इतर कौशल्याबरोबरच प्रत्येक सुरक्षारक्षकांची उंची ही किम जोंग उन यांच्या उंचीएवढीच असावी हा सर्वात महत्त्वाचा निकषही त्यांच्यासाठी असतो.

North Korea : जाणून घ्या हुकूमशहा किम जोंग उनचा उत्तर कोरिया नेमका आहे तरी कसा

बंदुक चालवण्याचं उत्तम कौशल्य त्यांच्यात असतं, फक्त आणि फक्त याच सुरक्षारक्षकांना हुकूमशहासमोर बंदुक बाळगण्याची परवानगी असते. विशेष म्हणजे यातल्या बहुतेक सुरक्षारक्षकांचा किम जोंग उन यांच्या कुटुंबाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबध आहे. त्यामुळे निवड करताना या कुटुंबाच्या किंवा उत्तर कोरियातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या कुटुंबाशी जवळचे संबध असलेल्याच सुरक्षारक्षकांचीच निवड केली जाते.