Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि दोन तरूण अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कधी कधी काही पुरुष महिलांपेक्षाही खूप सुंदर डान्स करतात. हुबेहूब महिलांसारख्या डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभावही अगदी एखाद्या महिला डान्सरला लाजवतील इतके सुंदर असतात. सध्या असाच एक ग्रुप डान्स पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी आणि दोन तरूण बॉलिवूडमधील एकेकाळी खूप चर्चेत आलेल्या “चिंता ता चिता चिता”, या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमचेही लक्ष वेधून घेईल. सध्या त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @manoj_thapa_775 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “खूप सुंदर डान्स केलात” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “एकदम कडक.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप मस्त डान्स भावांनो.” आणखी एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, “तुमचा डान्स लय भारी आहे.”