लहान मुलांना दिसेल ती वस्तू तोंडात घालण्याची सवयच असते. मात्र, भविष्यात ही सवय त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. सध्या वसईमधून असे एक प्रकरण समोर आले आहे ज्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. वसईतील एका १३ वर्षांच्या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी जवळपास दीड किलोचा केसांचा गोळा बाहेर काढला आहे. हे वाचून तुम्हालाही अस्वस्थ वाटतंय ना? पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे.

या मुलीला वयाच्या सात ते आठ वर्षांपासूनच स्वतःचेच केस उपटून खाण्याची सवय होती. घरात कुणाचेही लक्ष नसताना ती स्वतःचे केस खायची, मात्र घरातल्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. सात-ते आठ वर्षांपासून तिच्या पोटातच हे केस जमा झाले. यानंतर या केसांचा एक भलामोठा गोळा तयार झाला. मात्र, कालांतराने मुलीला पोटदुखीचा त्रास सुरु झाला.

या मुलीने काहीही खाल्लं की तिला लगेच उलटी व्हायची, भूक लागायची नाही, तसेच तिचे पोटही फुगले होते. मुलीची अवस्थापाहून कुटुंबियांनी तिला लगेचच रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीवर तात्काळ उपचार सुरु केले. सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांना या मुलीच्या पोटात केसांचा गोळा दिसून आला. हा गोळाही लहान नसून चांगलाच १.२ किलोचा होता. हा गोळा काढण्यासाठी डॉक्टरांनी मुलीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

बिर्याणीवरून ग्राहकांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण; CCTV Viral झाला आणि…; पाहा नेमकं काय घडलं

वसईच्या डिसुझा हॉस्पिटलमध्ये तब्बल एक तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. यानंतर मुलीच्या पोटातून हा भलामोठा केसांचा गोळा बाहेर काढला. या गोळ्याचा आकार जठारासारखाच होता. त्याचे वजन १.२ किलो, रुंदी १३ इंच आणि लांबी ३२ इंच इतकी होती. मात्र अशाप्रकारचं हे पाहिलंच प्रकरण नाही. याआधी जगभरात अशी पन्नासहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

मुलीच्या पोटाची तपासणी केल्यानंतर आणि सोनोग्राफी अहवालाचा अभ्यास केल्यानंतर शस्त्रक्रिया करणारे डॉ. जोसेफ डिसूझा मुलीच्या पालकांची बोलले तेव्हा त्यांना कळले की तिला गेल्या सात ते आठ वर्षांपासून केस गिळण्याचा आणि नखे चावण्याचा इतिहास आहे. हा एक मानसिक विकार असून याला रॅपन्झेल सिंड्रोम म्हणून ओळखले जाते, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.