भारतीय प्रत्येक क्षेत्रात आपले नाव गाजवत आहेत. गुरुवारी १३ वर्षीय भारतीय-अमेरिकन हरिनी लोगानने (Harini Logan) इतिहास रचला. या मुलीने स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी कॉम्पिटिशन २०२२ मध्ये ९० सेकंदाच्या स्पेल-ऑफमध्ये २१ शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगून प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली. ट्रॉफीसोबतच हरिनीला ५० हजार डॉलर म्हणजेच सुमारे ३८ लाख रुपये रोख आणि बक्षिसेही देण्यात आली आहेत.

हरिनी लोगानला एकदा स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी मधून काढून टाकण्यात आले होते, त्यानंतर तिला पुन्हा एकदा सहभागी करून घेण्यात आले होते. विक्रम राजू विरुद्धच्या तीव्र संघर्षात तिचे चार शब्द चुकले, ज्यात तिला शीर्षक मिळाले असते. पहिल्या-वहिल्या लाइटनिंग-राउंड टायब्रेकरमध्ये, हरिनीने शेवटी ट्रॉफीवर दावा केला.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
9 year old deadlifting 75 kg viral video
भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…
Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

टेक्सासमधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी हरिनी हिने ९० सेकंदांच्या स्पेलऑफमध्ये २१ शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ अचूकपणे लिहून विक्रम राजूचा सहा गुणांनी पराभव केला. हरिणी ही स्पेलिंगबाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्पर्धकांपैकी एक आहे आणि तिच्या संयम आणि सकारात्मकतेमुळे ती कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या सर्वांची आवडती ठरली. तिने ५० हजार डॉलरपेक्षा जास्त रोख आणि बक्षिसे जिंकली आहेत.

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

हरिनीने खूप लवकर उत्तरे दिली आणि संपूर्ण वेळ विजेतेपदाच्या शर्यतीत राहिली. सरतेशेवटी ज्युरींनी त्यांच्या गुणांची अंतिम जुळणी करून हरिनी आणि विक्रम यांच्या विजयाची पुष्टी केली.