delhi wedding video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास क्षण असतो. आपल्या लग्नातले काही महत्वाचे क्षण अनेकजण व्हिडिओच्या मार्फत सोशल मीडियावर शेअर करत असतात. यातील अनेक व्हिडिओ मजेशीर असतात तर काही भावनिक देखील असतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये एक लग्न झालेले जोडपे दिसत आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात लग्न झालेली महिला ५२ वर्षाची आहे तर तरुण २१ वर्षाचा आहे. हे लग्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

महिला म्हणाली ”मी याला ३ वर्ष..”

असं म्हणतात की लग्नासाठी प्रेम आणि आदर खूप महत्त्वाचे असतात. लग्न हा एक प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो, जो आयुष्यभर पाळावा लागतो. त्यामुळेच लग्नाचा निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्यावा असे लोकं म्हणतात. जर एकमेकांची मने जुळली तर वयातील अंतर देखील कमी वाटतं. या लग्नाच्या व्हिडिओमध्ये एका २१ वर्षीय मुलाने ५२ वर्षीय महिलेशी लग्न केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा मुलगा म्हणतोय की माझे लग्न झाले आहे. प्रेमाला वय नसते. माणसाचे मन पाहिले पाहिजे, जर मन चांगले असेल तर सर्वकाही चांगले आहे. तर ५२ वर्षांची महिला म्हणतेय, माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी याला ३ वर्षांपासून पाहिले आहे.

( हे ही वाचा: जंगलात अचानक धावताना दिसली डायनासोरची पिल्ले? व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: मिठाईवरून भर लग्नमंडपात वधू आणि वराचे जोरदार भांडण; स्टेजवरच एकमेकांना मारत सुटले अन…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, मला माझ्या आईच्या बरोबरीच्या स्त्रीशी लग्न करायला लाज वाटत नाही. आणखी एका यूजरने लिहिले की, मुली आता मुलाच्या बरोबरीच्या झाल्या आहेत. जेव्हा पुरुष आपल्या मुलीच्या वयाच्या महिलेशी लग्न करू शकतो, तर स्त्री आपल्या मुलाच्या वयाच्या तरुणाशी लग्न का करू शकत नाही? या कलियुगात आता सर्व काही चालत.