देशाची राजधानी दिल्लीतून चोरीचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे हिऱ्याचे दागिने, पैसे व इतर कार नसून दूध चोरणाऱ्या एका चोराला पोलिसांनी पकडले आहे. या व्यक्तीवर सुमारे ४ लिटर दूध चोरल्याचा आरोप आहे. आरोपींनी कालकाजी येथील डीडीए फ्लॅटमधील दुकानातून ४ लिटर दूध चोरल्याचे सांगण्यात येत आहे. २८ एप्रिल रोजी सकाळी ८.५२ वाजता कालकाजी पोलीस ठाण्यात चोरीच्या संदर्भात पीसीआर कॉल आला.

घटनास्थळी पोहोचल्यावर तक्रारदाराने सांगितले की, दूध पुरवठादाराने दूध दिले आणि माझ्या दुकानासमोर ठेवले. जेव्हा तो त्याच्या दुकानात पोहोचला तेव्हा त्याचा शेजारी तपन दास एका मुलाला घेऊन त्याच्या दुकानात आला ज्याच्याकडे ४ लिटर अमूल दूध होते. शेजाऱ्याने सांगितले की, या मुलाने तुमच्या दुकानाबाहेरून ४ लिटर दूध चोरले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याला पकडले.

(हे ही वाचा: मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आईकडून पोलिसांनी करून घेतली मालिश, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीला केली अटक

राजकुमार (२४) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीच्या जबानीवरून एफआईआर कलम ३६५/२२ एफआईआर कलम ३७९/४११ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी राजकुमार याला अटक करून त्याच्याकडून चोरीचे दूध जप्त करण्यात आले. आरोपीला मा.न्यायालयात हजर करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोपीचा यापूर्वी कोणत्याही प्रकरणात सहभाग नसल्याचे बोलले जात आहे. उर्वरित प्रकरणाची चौकशी सुरू आहे.