‘पायाखालची जमीन सरकली’ ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेलच. असाच काहीसा प्रकार सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहायला मिळाला. या धक्कादायक घटनेने सर्वांना हादरून टाकले आहे. या व्हिडिओत कॉलेजची पार्टी सुरू आहे. यामध्ये विद्यार्थी एकत्र नाचत आहेत. पण अचानक एक भयानक घटना घडली, जे पाहून सर्वजण थक्क झाले. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कॉलेज विद्यार्थ्यंची पार्टी सुरू आहे. यामध्ये विद्यार्थी एकत्र येत बेभान होत नाचताना दिसत आहेत. पण यावेळी एक भयानक घटना घडली ज्यामुळे त्याठिकाणी जमलेले सर्वजण हादरून गेले. डान्स करत असताना अचानक पायाखालची जमीन खचली आणि सर्व विद्यार्थी जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पेरूच्या सॅन मार्टिनची आहे. या पार्टीमध्ये २५ हून जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. पण पुढे नक्की काय घडणार याची कल्पना कोणालाच नव्हती. पार्टीमध्ये जमीन खचल्याने सर्व विद्यार्थी खाली पडले.
येथे पाहा थरारक घटना..
हा भयानक व्हिडिओ pop_o_clock नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या घटनेत किती विद्यार्थी जखमी झाले याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकली नाहीये. मात्र हा व्हिडिओ पाहून अनेकजण हादरून गेले आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला भरपूर व्हयूज मिळाले असून २८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. तसच अनेकण या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.