असं म्हटलं जातं की, प्रेमासमोर कितीही पैसा ठेवला तरी तो फिका पडेल. पैसे आणि प्रेम हे दोन्ही शब्द अगदी लहान आहेत मात्र त्यांचा अर्थ खूप खोल आहे. काही जण आपल्या कुटुंबाला पैशासाठी सोडून जातात तर काही जण पैशाचा कुटुंबासाठी त्याग करतात. प्रेमापुढे जगाभरातील संपत्ती कमी पडते. पण काय करोडो रूपयांनी प्रेम विकत घेता येतं का? पैसा आज प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. जेव्हा लग्नासाठी मुली मुलगा शोधतात तेव्हा पहिल्यांदा त्याचा पगार पाहिला जातो. लग्नानंतर आपल्या मुलीला चांगल आयुष्य मिळावं ही प्रत्येकाची इच्छा असते. दरम्यान काही मुलींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये मुलीना प्रेम की पैसे काय जास्त महत्वाचे असा प्रश्न विचारला आहे यावर त्यांनी काय उत्तर दिलं हे तुम्हीच पाहा.

इंस्टाग्रामवर mamta_parmar_999 नावाच्या अकऊांटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एक महिला चार मुलींकडे जाते आणि पैसा कि प्रेम? काय निवडाल असं विचारते. यावर पहिली मुलगी म्हणजे पैसा, कारण पैसाच आजकाल सर्वकाही आहे. प्रेमानं पोट भरत नाही त्यामुळे पैसाच. यावर दुसरी मुलगी दोन्ही पर्याय निवडत म्हणजे दोन्हीही गरजेचं आहे. अशाच तिसऱ्या मुलीला विचारले असता ती म्हणते पैसाच, पण जर तुम्ही फॅमिली आणि पैसे विचाराल तर फॅमिली. दरम्यान चौथ्या मुलीचं उत्तर एकून तुम्ही अवाक् व्हाल.

गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी म्हणते मी प्रेम निवडेन कारण पैसे तर मी स्वत: कमवेन आणि त्यालाही कमवायला शिकवेण. तरुणीच्या या उत्तरानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होत असून व्हिडीओला ११ लाख ९ हजाराहून अधिक ह्व्यूज गेले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मनालीमधील अटल टनल बोगद्यातील VIDEO व्हायरल; धडकी भरवणारे ७ सेकंद अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैशाच्या अमर्याद क्षमतेमुळे ‘पैशाने प्रेमही विकत घेता येतं,’ यावर विश्वास ठेवला जातो. प्रेमातील भावना आजही बदललेल्या नाहीत. मात्र, काळाच्या ओघात झालेलं नात्यांमधलं परिवर्तन आपण स्वीकारलेलं नाही. अशी अनेक उदाहरण आहेत ज्यातून हे सिद्ध झालंय.

संत कबीरांनी म्हटलंय, प्रेम न बाडी उपजे प्रेम न हाट बिकाई | राजा परजा जेह रुचे सीस देह ले जाई ॥ प्रेम कधी शेतात उगवत नाही, नाही बाजारात विकत घेता येत, राजा असो वा प्रजा, प्रेम मिळवण्यासाठी त्याग करावाच लागेल.हे अंतिम सत्य कदाचित आजच्या पिढीला मान्य होणार नाही.