भारतामध्ये कित्येक मंदिर आहेत ज्यांचा शेकडो वर्ष जुना इतिहास आहे. अशाच एका मंदिरामध्ये दक्षिण भारतातील शेकडो वर्षे जुन्या मंदिराच्या उत्खननाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हे मंदिर ज्याला श्री दक्षिणमुखी नंदी तीर्थ कल्याणी क्षेत्र म्हणून ओळखले जाते हे कर्नाटकातील बंगलोर शहरातील गंगाम्मा मंदिरासमोरस्थित आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये उत्खननादरम्यान येथे नंदी महाराजांची मूर्ती कशी सापडली, त्यानंतर संपूर्ण मंदिर उत्खननादरम्यान कसे बाहेर आले हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

उत्खननात पूर्ण मंदिर उदयास आले
धार्मिक सनातनी यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की, जेव्हा काही मजूर या भागात खोदत होते तेव्हा त्यांना खाली एक आकृती दिसली, जेव्हा तेथे खोदकाम पूर्ण केले गेले तेव्हा नंदीची मूर्ती सापडली. विशेष म्हणजे नंदीच्या मूर्तीवरून सतत पाणी पडताना दिसत होते. नंतर उत्खननादरम्यान असे आढळून आले की, “नंदीच्या मूर्तीच्या खाली एक शिवलिंग आहे, ज्यावर नंदी अभिषेक करतो. त्यानंतर उत्खननादरम्यान संपूर्ण मंदिर बाहेर आले.”

हेही वाचा – भुकेल्या कुत्र्याच्या पिल्लांची चिमुकलीला आली दया! ‘अशी’ केली त्यांची मदत, ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून लोक झाले भावूक

हेही वाचा – World Cup: क्रिकेटप्रेमींनो सावधान! वर्ल्ड कपच्या नावाखाली होतेय फसवणूक, तरुणीनं ५६ हजारांत घेतलं फायनलचं तिकिट, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मंदिराला नंदी तीर्थ, नंदीश्वरा तीर्थ, बसव तीर्थ किंवा फक्त मल्लेश्वरम नंदी गुढी असेही म्हणतात. मंदिराचे मुख्य देवता शिव हे शिवलिंग (लिंगम) स्वरूपात आहे. व्हिडीओमध्ये हे मंदिर ४०० वर्षे जमिनी खाली जुने असून १९९७ मध्ये पुन्हा सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर लोक मंदिराविषयीचे त्यांचे अनुभव शेअर करत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘इथे खूप शांतता आहे, हे आश्चर्यकारक आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘जमिनीखाली बरेच काही आहे ज्याबद्दल आम्हाला माहिती नाही.’