Elephant viral video: हत्तींचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. हत्तींचा कळप, त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांचे मजेशीर व्हिडीओही आपलं लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर एका हत्तीच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला असून, मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हत्ती झाडावर चढून फणस खाताना दिसत आहे.व्हिडिओ शेअर केल्यानंतर हजारो नेटिझन्सनी तो व्हिडिओ पाहिला आहे. हत्तीच्या वजनाने झाड मोडू शकते. पण, हत्ती झाडावर जास्त वजन न टाकता अलगदपणे फणस तोडतो व खाली पडल्यानंतर खाताना दिसत आहे.

झाडावरचे फणस कसे काढले?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक भलामोठा हत्ती फणस खाण्यासाठी फणसाच्या झाडाखाली उभा आहे. या हत्तीला फणस खायचे आहेत. पण फणस उंचावर आहेत, त्यामुळे तो काही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.तो चक्क आपल्या मागच्या २ पायांवर उभा राहिला. आणि पुढचे पाय त्यानं झाडाच्या फांदीवर अडकवले. त्यामुळे फांदी थोडी खाली वाकली अन् मग त्यानं सोंडेच्या मदतीनं फणस काढून खाल्ले. हत्तीचं वजन पाहाता झाडावरचे फणस काढणं त्याला शक्य होईल असं वाटत नाही. पण त्यानं बुद्धीचा वापर करून अशक्य असं वाटणारं कामही शक्य करून दाखवलं. यावेळी आजूबाजूला लोक ओरडत असल्याचा आवाज येत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: बापरे! सिंहीण करत होती बिबट्याची शिकार, पण तेवढ्यात…तुम्ही कल्पनाही केली नसेल असा झाला शेवट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात वजनदार प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हत्तीचं वजन हे सरासरी पाच ते सहा हजार किलो इतकं असतं. त्यामुळे इतक्या वजनदार प्राण्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणं काही सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड शक्तिची गरज भासेल. त्याला स्वत:ला स्वत:चं शरीर जड असतं, त्यामुळे हत्तीची चाल नेहमी संथ असते, मात्र आता फळ खाण्यासाठी हत्तीनं दाखवलेलं रुप पाहून सगळेच चकीत झाले.