Viral Video: व्यस्त जीवनशैलीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक काय करतात? याबद्दलचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात, ज्यामध्ये निरोगी राहण्यासाठी विविध व्यायाम आणि आहार योजनांचे मंत्र सांगितले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर फिरत आहे, ज्यामध्ये एक पाच महिन्यांचे बाळ आपल्या आईसोबत व्यायाम करताना दिसत आहे. या पाच महिन्यांच्या बाळाचा व्हिडीओ आपल्या धैर्याने आणि चिकाटीने सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ पाहत आहेत आणि त्याला खूप पसंत करत आहेत.
व्हिडीओमध्ये आई पहिल्यांदा योग मॅटवर झोपून व्यायाम करताना दिसत आहे. आईला पाहताच मूलही पोटावर झोपून आईकडे पाहू लागते. दरम्यान, आई प्लैंक व्यायाम करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आई आपले दोन्ही हात जमिनीवर ठेवून दोन्ही पाय मागे खेचताना दिसत आहे. आईला पाहून मूलही तेच करू लागते. व्हिडीओमध्ये मुलाला आईप्रमाणे व्यायाम करतानाही दिसत आहे.
(हे ही वाचा: जन गन मन… थेट माउंट एव्हरेस्टवरुन; भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा राष्ट्रगीत गातानाचा Video Viral)
(हे ही वाचा: Video: मोदींनी आठ वर्षात ‘इतक्या’ देशांना दिली भेट; जाणून घ्या खर्चाचा आकडा)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘fitstagram.michelle’ नावाने शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३२.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत, तर १५,००० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. मुलाचे सामर्थ्य आणि धैर्य पाहून सर्वजण प्रभावित झाले होते, तर प्रत्येकजण मुलाला प्रोत्साहन देताना दिसला.