Man Killed By Neighbors After Dog Fight: अनेकांना आपले पाळीव प्राणी हे आजूबाजूच्या माणसांतून अधिक प्रिय असतात. आपल्या प्राण्याला जरासं कुणी ओरडलं तरी हे पेट पेरेंट्स समोरच्याची चांगलीच शाळा घेतात. काहींना तर आपल्या पाळीव प्राण्याला बांधून ठेवायलाही आवडत नाही. एक प्राणी प्रेमी म्हणून हे सगळं खूप गोड वाटत असेल तरी काही वेळा प्राणी खरोखरच आक्रमक ठरू शकतात. आणि त्यांना आपण काही बोलायला जावं तर त्यांचे पालक त्याहून जास्त आक्रमक होतात. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या चर्चेत आहे. आपल्या शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याला ‘कुत्रा’ म्हणण्यावरून झालेल्या भांडणात एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने आपला जीव गमावला आहे. तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील थाडीकोम्बू शहरात घडलेल्या या घटनेने पोलिसही थक्क झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार गुरुवार १९ जानेवारीला रायप्पन नामक ६५ वर्षीय शेतकऱ्याचे त्याच्या शेजाऱ्यांच्या कुत्र्याशी वाद झाले. डॅनियल आणि व्हिन्सेंट हे कुत्र्याचे मालक कुत्र्याला नीट ठेवत नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांवर हा आक्रमक कुत्रा हल्ला करतो अशी रायप्पन यांची तक्रार होती. अनेकदा त्यांनी याविषयी तक्रारही केली होती. गुरुवारी झालेल्या वादात संतापलेल्या रायप्पन यांनी कुत्र्याला नावाने हाक न मारता ‘कुत्रा’ म्हणूनच संबोधले तसेच त्याला पट्ट्याने बांधून ठेवा असेही त्याच्या मालकांना सांगितले. यामुळे कुत्र्याचे मालक इतके चिडले की दोघांमध्येही वाद सुरु झाला.

हे ही वाचा<<पोलिसांनी नको तिथं मारलं आणि आंदोलकानं गमावलं पौरुषत्व; हॉस्पिटलमध्ये नेताच..

साधारण वाटणारा हा वाद काहीच वेळात चिघळत गेला आणि रायप्पन यांनी कुत्र्याला हाकलण्यासाठी काठी उगारली.यावरून डॅनियल आणि व्हिन्सेंट इतके भडकले की त्यांनी उलट रायप्पनवरच हल्ला केला व दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. यावेळी रायप्पनला गंभीर दुखापत झाल्याने ते तिथेच बेशुद्ध होऊन पडले आणि हॉस्पिटल मध्ये नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा<< धीरेंद्र कृष्ण महाराजांची ‘चमत्कारिक चिठ्ठी’ आहे तरी काय? माईंड रीडरचा थक्क करणारा Video होतोय Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणी थडीकोम्बू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी कुत्र्याचे मालक डॅनियल व व्हिन्सेंट यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे.