सायकलवरुन २२०० किमी प्रवास करायचा आहे असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर वेड लागलंय काय अशी तुमची पहिली प्रतिक्रिया असेल. बरं त्यातही समोरील व्यक्तीचं वय ६५ च्या पुढे असेल तर तुमचा विश्वासच बसणार नाही…असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ६८ वर्षीय महिला सायकल चालवत वैष्णोदेवीसाठी चालली आहे. यासाठी महिला तब्बल २२०० किमी सायकल चालवून हे अंतर गाठणार असल्याचं सांगत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओत साडी नेसलेली ६८ वर्षीय महिला सायकलवरुन प्रवास करताना दिसत आहे. ट्विटरवर एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. युजरने व्हिडीओ शेअऱ करताना त्या बुलडाणा येथील खामगाव येथून प्रवास करत असल्याची माहिती दिली आहे. युजरने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “६८ वर्षीय मराठी महिला एकटी सायकलवरुन वैष्णोदेवीला जात आहे. खामगाव येथून २२०० किमी प्रवास…आईची शक्ती”.

व्हिडीओत व्यक्ती १७००, १८०० किमी अंतर असेल असा अंदाज वर्तवत आहे….यावर महिला २२०० किमी असं उत्तर देते आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत इतर कोणीही नसून एकट्याच आहेत. यावर त्या आपल्या मराठी माणसाने, महिलेने धाडस कधी करायचं…असं म्हणत त्या आपला निर्धार व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी समोरील व्यक्ती त्यांना पाणी देत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 68 year old marathi lady is going to vaishnodevi on cycle sgy
First published on: 20-10-2020 at 08:30 IST