Optical Illusion Test : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यात लोक अजिबात उशिर करत नाहीत. अशाच प्रकारचा एक फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या टेस्टमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात ९९ टक्के लोक फेल झाले आहेत. कारण या फोटोत लपलेल्या नेत्यांचे चहरे ओळखण्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. हा फोटो पाहून अनेक जण चक्रावून गेले आहेत. त्यामुळे जो कोणी या फोटोत लपलेल्या नेत्यांना ओळखेल तोच खरा बुद्धीमान समजला जाईल.
या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये लपले आहेत अनेक चेहरे
सोशल मीडियावर या ऑप्टिकल इल्यूजनला खूपवेळा पाहिलं जात आहे. तसंच लोक यावर प्रतिक्रियांचा वर्षावही करत आहेत. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये सुकलेल्या झाडाला दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये मोठ्या नेत्यांचे चेहरे लपले आहेत. या फोटोची क्रिएटिव्हिटी पाहून तुम्हालाहा आश्चर्य वाटेल, कारण या फोटोत किती चेहरे लपले आहेत, याचं अचूक उत्तर शोधणे अनेकांना कठीण वाटलं आहे. या झाडावर लपलेले सर्व चेहरे भारतातील दिग्गज नेत्यांचे आहेत. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, भगत सिंग यांचे चेहरे दाखवण्यात आले आहेत.
देशातील बड्या नेत्यांचे फोटो
या ऑप्टिकल इल्यूजनला पोस्ट केल्यानंतर यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. या फोटोला नॅशनल लीडर ट्री म्हणून पोस्ट करण्यात आलं आहे आणि नेत्यांना ओळखण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. यासारख्या ऑप्टिकल इल्यूजनला सोशल मीडियावर नेहमीच शेअर केलं जातं. कारण यूजर्ला अशा गोष्टींना नेहमीच पसंत करत असतात. तुम्ही या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये लपलेले चेहरे शोधू शकता? या सुक्या झाडावर पानांच्या जागेवर बड्या नेत्यांचे फोटो लपले आहेत.